Video Shows Mother Shouts At Pet Dog : बऱ्याचदा तुमच्यातील अनेक जण पाळीव प्राण्यांना कुटुंबातील एक सदस्यच मानतात. पाळीव प्राणी तुमच्याबरोबर राहून अनेक गोष्टी शिकत असतात. त्यांना तुम्ही वेळोवेळी खायला देता, इजा झाली की, त्यांच्यावर लगेच उपचार करता, त्यांच्या स्वच्छतेकडेसुद्धा लक्ष देता आणि त्यांच्या चुकांवर त्यांना ओरडतासुद्धा बरोबर ना? तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये श्वानाचे केस घरभर पडल्यामुळे आई त्याला चक्क ओरडताना दिसते आहे…
व्हायरल व्हिडीओ (Video) @waggytail_uno आणि @rachnasrivastava16 या इन्स्टाग्राम युजरच्या घरातील आहे. आई श्वानाला ओरडताना दिसते आहे. कारण- श्वानाचे केस घरात सगळीकडे पडलेले दिसत आहेत. तर याच कारणावरून आई श्वानाला म्हणते, “किती केस गळतात तुझे. रोज इतके केस गळायला लागले, तर सगळ्या मोलकरणी काम सोडून निघून जातील. मोलकरणी म्हणतात, “ज्या घरात उनो (पाळीव श्वान) असेल, त्या घरात आम्ही काम करणार नाही. आता तूच सांग मी काय करू?” तर यावेळी श्वान कशी प्रतिक्रिया देतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, श्वान गुणी बाळासारखे आईचे बोलणे ऐकत असतो. तरीसुद्धा आई पुढे श्वानाला आणखीन ओरडते आणि म्हणते, “किती मोलकरणी नोकरी सोडून गेल्या. ‘उनो’चे एवढे केस गळतात. त्यामुळे आम्ही काम करणार नाही, असे त्या मोलकरणी म्हणायच्या. तर सांग, उनो मी काय करू आता? काही उपाय सुचवशील (suggestion) का? बरं ते जाऊ देत तू काहीच काम करत नाहीस, घरात असाच बसून असतोस… फक्त आता हा व्हिडीओ बनवलेला बघशील, फक्त स्वतःचा व्हिडीओ बनवून घेतोस एवढंच करतोस.” त्यावर श्वान फक्त कॅमेऱ्याकडे बघून साईड लूक देतो.
बिचारा उनो…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @waggytail_uno आणि @rachnasrivastava16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘बिचारा उनो, तो किती शांतपणे ऐकतो आहे, एक व्हॅक्युम क्लीनर खरेदी करा आणि मला ऐकवणे थांबवा, श्वानाने कॅमेऱ्याकडे बघून साईड लूक खूप मस्त दिला’ आदी विविध प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.