Viral Video: सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की, जिथे चांगल्या कामगिरीने लोक प्रसिद्ध होतात; तर वाईट गोष्टीने ट्रोलही होतात. काही जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतात, तर अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी विचित्र स्टंटचा उपयोग करतात. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती सहा जणांना एका दुचाकीवरून घेऊन जाताना दिसत आहे. अशक्य गोष्टी शक्य करण्याची हिंमत या व्यक्तीमध्ये आहे, असे तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्कीच म्हणाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हापूरमधील आहे. एक प्रवासी एक-दोन नव्हे, तर सहा जणांना दुचाकीवर बसवून प्रवास करताना दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने प्रवासादरम्यान हे पाहिलं आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती ‘तुम्ही सर्व कुठे जात आहात?’ असे विचारते. तेव्हा दुचाकीचालकाच्या खांद्यावर बसलेली एक चिमुकली ‘आम्ही हाजीपूरला जात आहोत’, असे उत्तर देताना दिसत आहे. धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा हा स्टंट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याच्याविरोधात एक ट्विट पोस्ट केलं आहे.

हेही वाचा…कंडक्टरला विसरून बस निघाली सुसाट; प्रवाशाने करून दिली आठवण अन्… पाहा हा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, एका मोटारसायकलवर सात जण बसलेले दिसून आले आहेत. दुचाकीचालकाच्या मागे चार, खांद्यावर एक, चालक आणि त्याच्या पुढे एक मुलं बसलेलं दिसतं आहे. म्हणजेच चालक अगदीच विचित्र पद्धतीने दुचाकी घेऊन प्रवास करताना दिसत आहे. फक्त दहा सेकंदाच्या व्हिडीओने स्थानिक पोलिसांचेही लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी या व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट काढला आणि ९,५०० रुपयांचे चलान जारी केले आणि तात्काळ दखल घेतली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट हापूर पोलिस यांच्या @hapurpolice एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि त्या दुचाकीचालकावर चलान जारी केले आहे. एका दुचाकीवर सहा जणांना बसवून अजब कौशल्य दाखवणाऱ्या या व्यक्तीला स्वतःची तर पर्वा नाहीच, पण त्याच्याबरोबर असलेल्या सहा मुलांचीसुद्धा चिंता नाहीये. पोस्ट पाहून अनेक जण वाहतूक पोलिसांचे कौतुक करताना दिसत आहेत व अशा व्यक्तींना वेळीच धडा शिकवला पाहिजे, असेसुद्धा म्हणताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows seven person sitting on one bike little girl sitting on one of the pillion riders shoulders watch ones asp
Show comments