Viral Video Shows Not All Strangers Have Bad Intentions : अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये असे अनेकदा आपल्याला आवर्जून सांगितले जाते, कारण फसवणूक होण्याची शक्यता असते. एखादी व्यक्ती चोर निघाली किंवा आपल्यावर भूल टाकून दुसरीकडेच घेऊन गेली तर, असे असंख्य प्रश्न मनात येतात; त्यामुळे सहसा प्रवासाच्या वेळी आपण शेजारी बसणाऱ्या व्यक्तीशी बोलायलासुद्धा घाबरतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एका अनोळखी, अज्ञात व्यक्तीच्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकलेली दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओत एक महिला आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन दुकानात शॉपिंग करायला गेलेली असते. यादरम्यान दुकान कामगार महिलेकडे बघून ‘तुमचा मुलगा किती महिन्याचा आहे?’ असे विचारतो, तेव्हा ‘पाच महिन्याचा आहे असे महिला सांगते.’ नंतर महिला ‘तुला बाळाला हातात घ्यायचे आहे का’ असे विचारते. त्यानंतर ‘मला भीती वाटते’ असे दुकान कामगार म्हणतो. हे ऐकून ‘अरे काहीच नाही होणार’ असे म्हणून महिला बाळाला दुकान कामगारच्या हातात देते. तर पुढे काय होते हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सर्व अनोळखी लोकांचे हेतू वाईट नसतात
अनेकदा एका प्रसंगामुळे आपण सगळ्याच व्यक्तींना त्याच नजरेने बघायला जातो. पण, सगळेच चुकीच्या हेतूने आपल्याशी बोलायला येत नाहीत. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, दुकान कामगारच्या हातात बाळ येताच तो खूश होतो आणि त्याला बाळाला कोणाला दाखवू आणि कोणाला नको असे झालेले दिसते आहे. त्यानंतर तो स्वतःचा मोबाईल काढतो आणि मग कोणालातरी व्हिडीओ कॉलसुद्धा करतो आणि त्या चिमुकल्या बाळाला घेतले आहे असे आनंदाने दाखवतो. हे पाहून महिलासुद्धा खूश होते आणि दुकानात आलेले अनेक ग्राहकसुद्धा आश्चर्याने या दृश्याकडे बघू लागतात.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dressdiary.in_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सर्व अनोळखी लोकांचे हेतू वाईट नसतात’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच अनेकांना हे लहान बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजत नसते, त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहून महिलेने कमेंट केली आहे की, ते बाळ मुलगी नाही तर मुलगा आहे, असे आवर्जून सांगितले आहे आणि व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवादसुद्धा म्हटले आहे.