Video Shows Son Arranged Surprise Party For Mom And Dad : जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न ठरते मग ते अरेंज असो किंवा लव्ह. दोघांच्याही डोळ्यात आनंद आणि दु:ख असे दुहेरी अश्रू असतात. हा क्षण असा असतो जेव्हा एकीकडे नवीन संसाराची स्वप्न, कुटुंबातील कोणालाही न दुखावता संसार वर्षानुवर्षे चालवायचा असतो. असाच एक क्षण या जोडप्याच्या आयुष्यात आला. जेव्हा बघता बघता त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. तर लग्नाची २५ वर्षे आणखीन खास करण्यासाठी या जोडप्याच्या मुलाने बरीच मेहनत घेतली. नक्की मुलाने काय केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
आई-बाबांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात लेकाने सरप्राईज पार्टी ठेवलेली असते. यादरम्यान त्याने हॉटेल बुक करून त्याच्या नातेवाईकांना, कुटुंबातील सदस्यांना आणि मित्र-मैत्रिणींना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले. पण, आई-बाबांना या बाबतीत कुठलीच कल्पना नसते. फक्त लेकाच्या सांगण्यावरून आई बाबांना छान तयार होऊन हॉटेलमध्ये येत असतात फोटोग्राफर त्यांचा व्हिडीओ शूट करत असतो. पुढे काय घडते हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई बाबांना छान तयार होऊन हॉटेलमध्ये येत असतात फोटोग्राफर त्यांचा व्हिडीओ शूट करत असतो. त्यानंतर हॉटेलच्या गार्डनमध्ये त्यांचा लेक आणि जमलेली सगळी मंडळी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून आणि ओरडून स्वागत करतात. लेक पुष्पगुच्छ घेऊन आई-बाबांजवळ येतो. लेक दोघांच्या पाया पडायला जातो तितक्यात आई त्याला मायेने जवळ घेते आणि त्याच्या कपाळावर किस करते. सगळ्या आलेल्या पाहुणे मंडळींना पाहून बाबांना आनंदाचा धक्का बसतो.
कौटुंबिक क्षण काम सार्थकी लावतात… (Viral Video) :
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ हॉटेलच्या @tara_restaurant_and_lawns या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुम्ही लाडक्या मुलाने दिलेल्या सरप्राईज पार्टीसह लग्नाची २५ वर्षे साजरी करता’ असा मेसेज तर ‘अशा प्रकारचे कौटुंबिक क्षण आमचे काम सार्थकी लावतात! आमच्या खास पाहुण्यांना २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत.