Video Shows Son Take Whole Family On A Flight : रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी, अगदी बोटने सुद्धा आपण नेहमी प्रवास करतोच. पण, विमानात प्रवास करणे हे आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असतेच. विमानतळावर पोहोचल्यानंतर तुम्ही काय कराल, तुम्ही कसे चढाल, तुम्ही विमानात कसे उतराल याची भीती आणि तर नवीन काहीतरी अनुभवण्याचा आनंद अश्या मिक्स फीलिंग्स असणारा हा प्रवास आयुष्यात आपण आणि आपल्या घरच्यांचीही करावा अशी इच्छा सगळ्यांची असते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत @heyy_datta इन्स्टाग्राम युजर आपल्या कुटुंबाला घेऊन विमानतळावर पोहचतो. विमानतळावर पोहचल्यापासून ते अगदी विमानात बसण्यापर्यंतचा त्याने सगळे क्षण व्हिडीओत टिपून घेतले आहेत. या व्हिडीओत @heyy_datta इन्स्टाग्राम युजरची नानी, मावशी, आई आणि बाबा असे सर्व कुटुंबातील सदस्य दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडी भीती, आनंद आणि उत्साह सुद्धा दिसतो आहे.कुटुंबाचा पहिला विमानप्रवास व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा बघा…

हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @heyy_datta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच स्वतःचे आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करताच त्याने स्वतःच्या भावना कॅप्शनमध्ये मांडल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे, विमानाने प्रवास करणे नेहमीच स्वप्नासारखे वाटायचे. लहानपणी मी आकाशाकडे बघत स्वतःशी बोलायचो आणि म्हणायचो एक दिवस असा येईल जेव्हा मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला किमान एकदा तरी विमानात घेऊन जाईन आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले. माझ्या नानी, मावशी, आई आणि बाबांना पहिल्यांदाच ते अनुभवताना, त्यांचा उत्साह, आनंद पाहताना माझ्यासाठी हे किती महत्त्वाचे आहे हे मी सांगू शकत नाही. कारण – हे त्यांचेही स्वप्न होते. मला खूप आनंद होतो आहे की, मी त्यांचे हे स्वप्न साकार करू शकलो.हा फक्त एक विमान प्रवास नाही तर ही एक भावना, पूर्ण केलेलं वचन आहे आणि स्वप्ने सत्यात उतरतात याची सुद्धा आठवण करून देतो आहे. आता फक्त एक स्वप्न पूर्ण झाले अणे आणि अजून बरीच स्वप्न पूर्ण करायची आहेत. ही फक्त सुरुवात आहे ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हिडीओ नक्की बघा

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना सुद्धा या तरुणाचा अभिमान वाटतो आहे. ‘मध्यमवर्गीय लोकांना छोट्या छोट्या गोष्टीत सुख रहायला आवडते म्हणून ते जास्त समाधानी असतात’, ‘ माझ्या आयुष्यात हा दिवस कधी येणार’, ‘हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते. माझेही विमानाने जायचे स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होईल हे देवालाच माहिती’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.