Viral Video Shows Son Fulfill Mother’s Dream : आपल्यातील प्रत्येक जण अनेक स्वप्नं उराशी जपत पुढे आलेला असतो. शिक्षण, मोठ्या कंपनीत नोकरी, त्यानंतर त्यातून मिळवलेल्या त्याच पैशानं मुंबईत हक्काचं घर, घराबाहेर स्वतःची आलिशान गाडी इत्यादी. तर ही स्वप्नं पूर्ण करून आई-बाबांना हक्कानं घरात घेऊन जाणं किंवा नव्याकोऱ्या गाडीत बसवणं, हेसुद्धा या यादीत नमूद केलेलं असतं. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये लेकानं आपल्या आईला मोठ्या अभिमानानं नव्याकोऱ्या गाडीत बसवलं आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video ) महिंद्रा कंपनीच्या शोरूमचा आहे. लेकानं नवीन गाडी विकत घेतली आहे. आई व लेक छान तयार होऊन शोरूममध्ये पोहोचतात. तरुणाचे सर्व मित्र फोनमध्ये हा क्षण शूट करून घेत असतात. लेक आईच्या खांद्यावर हात ठेवून तिला नवीन गाडीपाशी घेऊन जातो. गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिला मोठ्या मान-सन्मानाने आतमध्ये बसवतो. त्यानंतर लेकसुद्धा कारमध्ये बसतो. नवीन गाडीत बसल्यावर आईची पहिली प्रतिक्रिया काय असेल, ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘शरीरासाठी हॉस्पिटल आहेच पण…’ आजारपणामुळे टेन्शनमध्ये असणाऱ्या मित्राला क्षणात कसा हसवलं पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

आईसाठी ही गाडी दारात उभी करणार…

व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, लेकानं बरीच वर्षं मेहनत करून हक्काची गाडी विकत घेतली आहे. लेकासह गाडीत बसताच आईच्या डोळ्यांत चटकन पाणी येतं आणि ती त्याला अलगद मिठी मारते. हे पाहून लेकसुद्धा भावूक होतो आणि रडण्यास सुरुवात करतो. या क्षणाचा व्हिडीओ अलगद कॅमेऱ्यात कैद होतो. इवल्याशा पावलांनी चालत मोठ्या झालेल्या लेकानं आज आलिशान कारमध्ये बसवलं, मायेच्या कष्टाचं चीज झालं हा आनंद आईच्या डोळ्यांत दिसला, असं म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vip_cars_official_96 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक दिवस नक्कीच!’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. ‘आईसाठी ही गाडी आपल्या दारात उभी करणार’ असा मजकूर या व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. लेकाचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावुक झाले आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, आज भावाने जग जिंकल सलाम भावा तुझ्या कर्तुत्वाला’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows son with his hand on his mothers shoulder and sat her in the new car watch sweetest moment asp