Video Shows Students celebrate Holi Outside School : रंगपंचमी हा आपला एक अस्सल आणि महाराष्ट्राचे वेगळेपण जपणारा सण. देशभरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक दिवस आधीच शाळा, महाविद्यालये, कार्यालये आदी ठिकाणी होळी, रंगपंचमी सेलिब्रेट करण्यात येते. तर यंदा २०२५ ला रंगपंचमी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंगपंचमी हा सण येण्यापूर्वी खरी रंगपंचमी सुरू होते ती शाळा आणि कॉलेजमध्ये. शाळेत अनेक विद्यार्थी पिण्याच्या पाण्यात गुलाल घालून तो एकमेकांवर उडवून रंगपंचमी साजरी करतात.
तुम्हीही तुमच्या शाळेत नक्कीच रंगपंचमी साजरी केली असेल. विद्यार्थी शाळेत रंगपंचमी खेळतील म्हणून आधीच त्यासंबंधित सूचना दिल्या जायच्या. पण, मित्र-मैत्रिणींबरोबर हक्काची होळी खेळण्याचा हट्ट प्रत्येक विद्यार्थ्याचा असायचा, म्हणून अनेक जण शाळा सुटल्यावर रंगपंचमी खेळतात. तर व्हायरल व्हिडीओत आज हेच दृश्य बघायला मिळाले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शाळेतील काही मुले गणवेशात ग्रुप करून उभे आहेत. कशाप्रकारे रंगपंचमी सुरू आहे, व्हिडीओतून (Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
तर व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, शाळेतील विद्यार्थी अगदी उत्साहाने रंगपंचमी खेळत आहेत. एक विद्यार्थी सायकलवर बसला आहे आणि त्याला इतर विद्यार्थ्यांनी घेरलं आहे. तसेच बॅगेतून हे सगळे विद्यार्थी रंग घेऊन आले आहेत आणि त्यांनी एक वर्तुळ करून सायकलवर बसलेल्या मुलाभोवती उभे राहून त्याच्यावर एकत्र रंग टाकताना दिसत आहेत आणि अशाप्रकारे रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे, हे पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील एवढे तर नक्की.
आम्हाला शिक्षापण झाली…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @flawsfruttt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणीत रमून गेले आहेत, तर काही जण आपल्या शाळेतील मित्रांना कमेंटमध्ये टॅग करत आहेत. तसेच एक युजर म्हणतेय की, ‘आम्हीपण शाळेत अशी रंगपंचमी साजरी केली आणि आम्हाला शिक्षापण झाली आणि पालकांना मिटिंगसाठीसुद्धा बोलावले. हा व्हिडीओ पाहून आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत’; अशी कमेंट करण्यात आली आहे.