Viral Video Show Students Gave Their Teacher Unforgettable Farewell : शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे शिकवितानाच जीवन कसं जगावं यासंबंधीही मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नात्याला विशेष महत्त्व आहे. हे नातं भीतीयुक्त आदरावर आधारित असतं. शिक्षक व विद्यार्थी सहा ते सात तास शाळेत एकत्र राहतात, एकत्र खेळतात, एकत्र जेवतात व अभ्यासही करतात यांतून या नात्याचं मित्रत्वात रूपांतर होतं. या पार्श्वभूमीवर आज सोशल मीडियावर यासंबंधीचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. आज काही विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या शिक्षकाचा निरोप समारंभ साजरा केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ तेलंगणातील आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील दुग्गोंडी हायस्कूलचे हिंदी विषयाचे शिक्षक जनार्दन यांनी अनेक वर्षं शाळेत शिकवलं. आज त्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. हा समारंभ शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षकांनी नव्हे, तर विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक जनार्दन यांना आदरपूर्वक निरोप देताना, त्यांची बैलगाडीवर बसवून एक खास मिरवणूक काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणखीन काय केलं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…ही दोस्ती जगात भारी! पावसाच्या साचलेल्या पाण्यातून श्वानाचे संरक्षण; मालकाने लढवली अशी शक्कल की… VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

व्हिडीओ नक्की बघा…

गुरु-शिष्याचं प्रेम :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विद्यार्थ्यांनी निवृत्त होणाऱ्या जनार्दन यांना बैलगाडीवर बसवलं आहे आणि बैलांच्या जागी स्वतः गाडी ओढताना दिसले आहेत. त्यानंतर एक मंडप बांधण्यात आला आहे तेथे जनार्दन यांचं फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं आहे.त्यानंतर साडी परिधान केलेल्या काही विद्यार्थिनींनी कोलातम व बटुकम्मास यांसारख्या पारंपरिक नृत्याचं सादरीकरणही केलं आहे. या खास कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रिय शिक्षकाबद्दलचं त्यांच्या मनातील आदरयुक्त प्रेम व्यक्त केलं आहे.

या कार्यक्रमानंतर माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विचार मांडताना भारतीय परंपरेतील गुरू-शिष्य या अतूट नात्यावर प्रकाश टाकला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sudhakarudumula या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने, “चांगल्या शिक्षकांचा विद्यार्थी नेहमीच आदर करतात. दुसऱ्या युजरने, “जॉबला लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा शिक्षकांना भेटावं आणि जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा गेट टुगेदर करावं”, असा पर्याय सुचवला आहे.

Story img Loader