Anand Mahindra Impressed By Man’s unique art to cycle design: नोकरीअभावी आपल्यातील प्रत्येकामध्ये दडलेला एक छंद असतो. संगीत, गायन, वादन, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, लेखन, काव्यलेखन, इत्यादी अनेक छंद माणूस आवडीनुसार जोपासत असतो. व्यक्तीची अभिरुची व आवडीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, उमेदवाराचा मानसिक स्तर, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासण्यात येतो. तर आज अशाच एका व्यक्तीची चर्चा होत आहे. ज्यांना नवनवीन, विविध आकाराच्या सायकल बनवण्याचा छंद आहे ; जे पाहून आनंद महिंद्राही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातचे रहिवासी सुधीर भावे या वयोवृद्ध व्यक्तींना अनोख्या सायकल डिझाईन करण्याचा छंद आहे. एका सायकलचे काम पूर्ण होण्यासाठी त्यांना सुमारे एक महिना लागतो. त्यांचे सायकल बनवण्याचे कोणतेही फिक्स टार्गेट नाही. पण, जेव्हाही त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते आणि त्यांचे मदतनीस एक प्रकल्प हाती घेतात आणि काम करण्यास सुरुवात करतात. कारण त्यांची स्वतःची अशी कोणतीच कार्यशाळा नाही आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचे मालक सांगतील तेव्हा त्यांना इतर कार्यशाळा वापराव्या लागतात. सुधीर भावे यांनी पोलाद उद्योगात सुमारे ४० वर्षे काम केले आहे ; ते दररोज त्यांनी बनवलेल्या बहुतेक सायकली वापरतात. एकदा पाहाच सुधीर भावे यांनी बनवलेल्या सायकल.

हेही वाचा…‘फक्त आनंद…’ हिरवा झेंडा फडकवणाऱ्या लोको पायलटला पाहून चिमुकलीची ‘ती’ गोंडस कृती; पाहा आजोबा-नातीचा ‘तो’ प्रेमळ VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, निवृत्त मेकॅनिकल इंजिनिअर सुधीर भावे यांनी व्यायाम करण्यासाठी एक सायकल बनवली आहे, सामानाची ने-आण करण्यास उपयुक्त अशी फोल्डेबल सायकल तर बॅटरी डिस्चार्ज झाल्यास पायाने, हाताने चालवू शकता अशी इलेक्ट्रिकल सायकलही त्यांनी व्हिडीओत दाखवली आहे ; जी सुमारे ५० किलोमीटर चालू शकते असा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ पाहून आणि सुधीर भावे यांचे काम पाहून आनंद महिंद्रही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही आहेत.

आनंद महिंद्रानी केलं कौतुक :

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा म्हणाले “मी सुधीर भावे यांच्या उर्जेला नमन करतो. सुधीर भावेने यांनी हे दाखवून दिले आहे की, भारतातील कल्पकता आणि स्टार्टअप हा केवळ तरुणांचा अधिकार नाही! जर तुम्हाला आमच्या वडोदरा कारखान्याची कार्यशाळा तुमच्या प्रयोगांसाठी वापरायची असेल तर मला कळवा. सुधीर, तुम्ही ‘निवृत्त’ नाही आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल काळ जगत आहात,” ; अशी आनंद महिंद्रा यांनी पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) आणि ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या @anandmahindra अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows sudhir bhave unique cycle design anand mahindra praised elderly man offered vadodara workshop for his experiments asp