Viral Video: लहान मुलांसाठी त्यांचा पहिला प्रवास हा खास असतो. ट्रेन, बस किंवा मेट्रोमध्ये पहिल्यांदा बसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. आजूबाजूचे नवनवीन चेहरे, खिडकीबाहेर दिसणारं दृश्य हे पाहून त्यांनाही नवल वाटते. यातच ही वाहने जर त्यांचे आई-बाबा चालवणार असतील तर त्यांच्या आनंद गगनात मावत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तिच्या कुटुंबासाठी काहीही करू शकते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू कशाप्रकारे आणू शकते हे दर्शवितो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. मेट्रो स्टेशनवर बाबा व चिमुकली आईची वाट पाहत उभे आहेत. तितक्यात मेट्रोतून आईची एंट्री होते. पण, आईची प्रवासी म्हणून नाही तर मेट्रो ट्रेनची लोको पायलट म्हणून एंट्री होतो. मेट्रोमधून ती चिमुकल्याकडे पाहून त्याला हॅलो करते. आपल्या आईला मेट्रो चालवताना पाहून चिमुकल्याचा आनंद गगनात मावत नाही ; हे त्याच्या हावभावावरून स्पष्ट दिसून येत आहे. आई, बाबा व चिमुकल्याचा हृदयस्पर्शी क्षण तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…रीलसाठी जीवाशी खेळ! धावत्या एस्केलेटरवर ‘तिने’ मारली उडी अन्… VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

व्हिडीओ नक्की बघा…

चिमुकल्याने आईबरोबर केला मेट्रोतून सफर :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाबा चिमुकल्यासह मेट्रोतून प्रवास करायला निघतात आणि मेट्रो स्टेशनवर आईची वाट पाहत असतात. तितक्यात मेट्रो चालवत आईची मेट्रो स्थानकावर एंट्री होते. नंतर आई चिमुकल्याला उचलून घेऊन मेट्रोतून प्रवास करण्यास घेऊन जाते. दोघही मेट्रोच्या दरवाजापाशी उभं राहून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत ; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू आणेल. एकूणच कुटुंबाच्या या प्रेमळ व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांची मन जिंकली आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tiaralincia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुमची आई मेट्रो चालक असते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. काही जण कुटुंबाची प्रशंसा करत आहेत. तर अनेक जण आईच्या कामाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.