Video Shows Couple Gift Winter Wear Headphones To Little Girl : शॉपिंग म्हणजे चिमुकली, तरुणी, अगदी महिलांचा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादी गोष्टी नजर पडताच आवडली की, ती खरेदी करण्याचा मोह आपल्याला अजिबात आवरत नाही. पण, अनेकदा असे होते की, जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा मार्केटमध्ये काहीच आवडत नाही. पण, जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा मात्र आपल्याला अनेक गोष्टी आवडू लागतात. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे घडले. चिमुकलीला एक छोटीशी वस्तू आवडली पण तिच्याकडे ती विकत घेण्यासाठी पैसेच नव्हते.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकली नाही. पण, मार्केटमध्ये एका स्टॉलवर कापसासारखे मऊ कार्टूनचे हेडफोन्स (Winter Wear Earmuffs) ठेवलेले असतात. चिमुकली हेडफोन्स हातात तर घेते पण आपल्याकडे पैसे नाहीत हे आठवतच ती पुन्हा हेडफोन्स ठेवून देते. हे मार्केटमध्ये असणारे एक अज्ञात जोडपे पाहते. त्यानंतर जोडपे त्या स्टॉलजवळ जातात आणि ते हेडफोन्स कितीला आहे असे विचारतात. नेमकं दोघ पुढे काय करतात हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, जोडपं चिमुकलीला स्टॉलवरील हेडफोन्स गिफ्ट करण्याचे ठरवतात. हेडफोन्स कितीला आहे असे विचारतात आणि डिस्काउंट देण्यास सुद्धा सांगतात. त्यानंतर दोघेही चिमुकलीला बोलावून घेतात आणि तुला यातला कोणता हेडफोन्स आवडला असे विचारतात. त्यानंतर तिला डोक्यावर घालायला सांगतात. चिमुकली डोक्यावरून काढून पुन्हा हेडफोन्स स्टॉलवर ठेवायला जाते. तितक्यात दोघे हे तुझ्यासाठीच आहे असे सांगून तिला हेडफोन्स घेऊन जायला सांगतात आणि चिमुकलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो
भावा मन जिंकलस (Viral Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @realtobetter या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भरभरून कौतुक करत आहेत आणि ‘फक्त एवढं श्रीमंत व्हायचं आहे’, ‘भावा मन जिंकलस’, ‘भोलेनाथ तुम्हा दोघांना नेहमी खुश ठेवो’, ‘व्हिडीओ पाहून मन खुश झालं’, ‘तुच्यासारख्या लोकांसाठी स्वर्ग बनवला आहे’ ; अशा कमेंट्स तर काही जण हेडफोन्स घेताना डिस्काउंट मागितल्यामुळे त्याला समजावताना दिसले आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.