Cat Knocking The Door Like Human Will Shock You : अनेकदा मित्रांबरोबर जेवायला गेल्यावर किंवा फिरायला गेल्यावर उशिरा घरी आलो की, रात्री दरवाजा ठोठावणे एक मोठा टास्क असतो. कारण- घरातील सगळी मंडळी अगदी साखरझोपेत असतात आणि अशा वेळी आपण उशिरा घरी गेलो आणि दरवाजा ठोठावला की, मग आई आपल्याला ओरडणार आणि अर्थात, सगळ्यांची झोप मोड होणार. असे एकदा तुमच्याबरोबरही नक्कीच झाले असेल. पण, तुम्ही मांजरांबरोबर असा प्रसंग घडला आहे, असे पeहिले आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ एका बिल्डिंगचा आहे. एक मांजर दिवसभर बाहेर असते. दिवसभर बाहेर फिरून, खेळून ती रात्री तिच्या हक्काच्या घरी परत येते. पण, खूप रात्र झाली असल्यामुळे घरातले सगळेच झोपलेले असतात. तर, मांजरीच्या जणू काही हे लक्षात येते आणि अगदी ती माणसाप्रमाणे दरवाजा ठोठावताना दिसते आहे. मांजर तिच्या पंजाने अगदी दोन ते तीन वेळा दार ठोठावण्याचा प्रयत्न करते. हे बिल्डिंगमध्ये राहणारी एक व्यक्ती पाहते आणि याचा व्हिडीओ शूट करते. एकदा बघाच हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पeहिले असेल की, एक अनोळखी व्यक्ती वरच्या फ्लोअरवरून मांजरीला दरवाजाच्या बाहेर उभे राहिलेले पाहते. कुटुंबातील सदस्यांनी आपल्याला घरात घ्यावे यासाठी ती दार ठोठावताना दिसते आहे. माणसे ज्याप्रमाणे हाताने दरवाजा वाजवतात, तसेच अगदी आपल्या पंजाचा वापर करून दरवाजा ठोकवते आहे, जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही एवढे तर नक्की. तसेच एवढ्या जोरात दरवाजा वाजवूनदेखील घरातील सदस्यांनी मात्र तिच्यासाठी दरवाजा उघडलेला दिसत नाही आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kofi8681 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मांजर दार वाजवत आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ काढणारी व्यक्ती मांजर दार वाजवत आहे हे पाहून इतक्या जोरजोरात श्वास घेते आणि जणू त्याने वाघच बघितला आहे हे पाहून अनेक नेटकरी मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच ही मांजर एवढ्या रात्री कुठून आली, ती कुठे गेलेली असे बरेच प्रश्न नेटकऱ्यांना पडलेले दिसत आहेत.