Video Shows Best Couple Dance : लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज यामध्ये नेहमीच वाद सुरू असतात. कुटुंबाच्या सहमतीने केलेले लग्न म्हणजे अरेंज मॅरेज आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर लग्न करणे म्हणजे लव्ह मॅरेज. अरेंजमध्ये नवरा-बायकोला एकमेकांबद्दल रोज नवनवीन गोष्टी कळतात आणि लव्ह मॅरेजनंतर नवरा-बायकोचे नाते नव्याने खुलते. पण, असे असले तरीही साथ देणाऱ्या जोडीदारावर सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर आज सोशल मीडियावर हेच उदाहरण सांगणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका जोडप्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.
व्हायरल व्हिडीओ (Video) एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओतील कॅप्शननुसार या जोडप्याचे लव्ह मॅरेज झालेले दिसते आहे. व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग पत्नीला पतीबरोबर डान्स करण्याची इच्छा असते. तर पत्नीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने खास पद्धत वापरली आहे. अनेक मंडळी या जोडप्याभोवती गोल गोल फिरताना दिसत आहेत आणि मधोमध व्हीलचेअरवर बसलेली दिव्यांग पत्नी आणि तिचा नवरा आहे. नवऱ्याने दिव्यांग पत्नीबरोबर नक्की कशा प्रकारे डान्स केला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, अगदी कपल रोमँटिक डान्स करतात अगदी त्याचप्रमाणे दोघेही डान्स करताना दिसत आहेत. फक्त पत्नी व्हीलचेअरवर बसली आहे आणि तिचा नवरा उभा असतो. तसेच कार्यक्रमात जमलेली अनेक मंडळी या खास जोडप्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. दिव्यांग पत्नीला चालता येत नसल्यामुळे ती उभी राहून डान्स करू शकत नाही. त्यामुळे त्याने पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला व्हीलचेअरवर बसवूनच रोमँटिक डान्स केला.
दिव्यांग पत्नीबरोबर खास डान्स
परिस्थिती काहीही असो; आपण त्यातून कसा मार्ग काढतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘नवरा होणे सोपे असते; प्रियकर होणे कठीण असते, प्रत्येक जण नाही बनू शकत’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि ‘ज्यांना बरोबर राहायचं असतं, ते प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक सुखात, दु:खात, संकटात अगदी मरेपर्यंत बरोबर राहतात’ आदी वेगेवेगळ्या कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.