Viral Video shows kitten fell into the well: आपल्यातील बऱ्याच जणांना मांजर, श्वान या सारखे प्राणी खूप आवडतात. त्यातच मांजर घराचे उंदरांपारून संरक्षण सुद्धा होते. कधीही एका शांत न बसणाऱ्या या मांजरी कधी स्वतःशीच खेळत असतात तर कधी एका घराच्या छतावरून दुसऱ्या घराच्या छतावर उड्या मारत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत इथे-तिथे उड्या मारणारी मांजरीचे पिल्लू संकटात सापडलं आहे आणि त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण व्हिडीओची सुरवातीला एक विहीर दिसते आहे. तसेच या खोल विहिरीत एक मांजरीचे पिल्लू पडलेलं आहे असे दोन चिमुकले आणि त्यांचे वडील पाहतात. तेव्हा मांजरीला वाचवण्यासाठी एक पाण्याची बादली खाली टाकतात. बादली मांजरीच्या पिल्लाजवळ पोहचताच ती बदलीच्या वर ऐटीत बसते. त्यानंतर हळूहळू बादली दोरीच्या सहाय्याने वर ओढली जाते. पण, मांजरीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं का? व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा….

हेही वाचा…‘लग्न महत्त्वाचे…’ गुलाबाची फुलं, थर्माकोलचे बदाम नव्हे, तर पानांनी सजवली नवरदेवाची गाडी; VIRAL VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

मांजरीच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकले व बाबा मांजरीच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. मांजरीच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी ते विहिरीत बादली टाकतात. मांजर त्यात बसते आणि दोरीच्या सहाय्याने तिला वर आणलं जात. पण, इथेच एक ट्विस्ट येतो. वर येताना बादली गोल-गोल फिरू लागते आणि मांजर पुन्हा विहिरीत पडते. त्यानंतर ते मोठी बादली घेतात आणि मांजरीला वाचवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरु करतात. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा प्रयत्न यशस्वी ठरतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @catlover88_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘केशरी रंगाची मांजर नेहमीच काहीतरी वेगळं करत असते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी बाबा व चिमुकल्याचे कौतुक करत ‘अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत’ असं म्हणत आहेत. तर काही जण मांजरीच्या गोंडसपणाचे कौतुक करत आहेत. तर काही जण मांजर पुन्हा पडली हे पाहून पोट धरून हसत देखील आहेत. एकूणच सोशल मीडियावर या अनोख्या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows the kitten fell into the well toddlers work hard to save the kitten watch they both are succeed in this task or not asp