Viral Video Of Penguin : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कधी कधी दोन प्राणी आपापसांत भांडताना, तर कधी मैत्रीसंबंध प्रस्थापित करताना, तर अनेक प्राणी आणि पक्षी त्यांच्या आगळ्यावेगळ्या सौंदर्याने मोहवून टाकतात. त्यांच्या हालचाली, हावभाव आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात. पण, त्यांच्याही जीवनात दररोज हृदयस्पर्शी गोष्टी घडत असतात. शिकारीदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना गमावणे या आणि अशाच बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबरही घडतच असतील. तेव्हा त्यांची व्यक्त होण्याची एक अनोखी पद्धत असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्राण्यांत संयमसुद्धा असतो हे आज दिसून आले आहे.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अनेक पाळीव प्राणी आपल्या मालकाची वाट पाहत थांबलेले असतात. प्राणी मुके असले तरीही ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करीत असतात. त्याचप्रमाणे अनेकदा तुम्ही प्राण्यांना रस्ताही ओलांडताना पाहिले असेल. गाड्या आल्या की थांबायचे, सिग्नल सुरू झाला की, रस्ता ओलांडायचा आदी अनेक गोष्टी त्यांनाही कळतात. तर आज एका पेंग्विनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक जोडपे त्या बर्फाळ प्रदेशातील निसर्गरम्यतेचा आनंद घेताना दिसत आहे. पेंग्विन त्या वाटेवरून जाताना त्या जोडप्याला पाहतो. पण, आश्चर्य म्हणजे पेंग्विन जणू त्यांना पाहून, अडथळा येऊ नये यासाठी संयम बाळगतो आणि तेथे थांबून राहतो. ते जोडपे वाटेतून बाजूला होण्याची प्रतीक्षा करतो आहे, असे वाटते.

bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…”
Man Tries to Help Girls Who Fell Off Scooty, But What Happens Next is Shocking
पापाच्या परींची मदत करायला गेला तरुण अन् होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
wedding bride dance video
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
Dolly Chaiwala has opened a new office in Dubai. A video shows him working on his laptop in this luxurious space video viral
VIDEO: दहावीनंतर शाळा सोडली आणि चहाची टपरी सुरू केली, ते आज थेट दुबईत इंट्री; ऑफिस पाहून थक्क व्हाल

हेही वाचा…‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video

व्हिडीओ नक्की बघा…

हा व्हायरल व्हिडीओ अंटार्क्टिकाचा आहे. अंटार्क्टिकच्या शांत, निसर्गरम्य भागात बर्फाळ वाटेवर एक जोडपे उभे असते. तसेच या जोडप्याच्या मागे एक पेंग्विन उभा असतो. पेंग्विन जणू काही ते जोडपे वाटेतून बाजूला होण्याची वाट पाहत होता. पेंग्विन थांबला आहे हे पाहून, ते जोडपेही वाटेतून बाजूला होते. मग पेंग्विन ‘विनम्रपणे’ आपल्या वाटेवरून चालू लागतो. पेंग्विनचा हा ‘समजूतदारपणा’ पाहताच जोडप्यालादेखील आश्चर्य वाटते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kevinspillman’s व @ciera.ybarra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १४१ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अंटार्क्टिकाची ही जागा ‘पेंग्विन महामार्ग’ म्हणून ओळखली जाते. पेंग्विनची ‘विनम्रता’ पाहून नेटकरीसुद्धा कमेंट्स करू लागले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘किती मस्त! त्याला केव्हा वाट बघायची, केव्हा जायचे अगदी व्यवस्थित माहीत आहे.

Story img Loader