Video Shows Father And Mother Taking Care Of Dog Like Their Own Child : आई-बाबांसारखे प्रेम फक्त आई-बाबाचा करू शकतात. कारण – इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना इतरांना निस्वार्थ प्रेम देण्यात आनंद वाटतो.दुसऱ्यांसाठी करता येईल तेवढे करावे, वाटेतील दगड उचलावा, वेदना देणाऱ्या काट्यांना स्वत:च्या हातांनी दूर करावे, आजारी लोकांची काळजी घ्यावी, रडणाऱ्यांचे अश्रू पुसून या सगळ्या गोष्टी आई-बाबा आपल्यासाठी आणि घरात आणण्यासाठी विरोध असलेल्या पाळीव प्राण्यासाठी सुद्धा करतात; हेच दृश्य दाखवणारा आजचा व्हायरल व्हिडीओ आहे.

@gabbar_is_supawstar इन्स्टाग्राम युजरच्या आई-वडिलांचा घरात पाळीव श्वान आणण्यास नकार होता. पण, तरीही तिला आवड होती म्हणून पाळीव श्वानाला ती घरात घेऊन आली आणि त्याचे नाव गब्बर असे ठेवले. खूप दिवस उलटून गेल्यावर गब्बर पडला, जेवला नव्हता तेव्हा हेच आई-वडील अस्वथ झाले. हे कळताच बाबा ऑफिसमधून निघून दुपारी घरी आले. गब्बरला आवडतं म्हणून दोन शहाळे सुद्धा आणले. आई-बाबाचे प्रेम व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

त्यांच्याबरोबरचे नातं काही वेगळच…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, गब्बर आजारी असल्यामुळे आई-बाबा अवस्थ झाले आहेत. बाबा ऑफिसमधून लवकर घरी आले आणि येताना शहाळे घेऊन आले. आईने शहाळ्यातले पाणी काढून देत होती आणि बाबा त्यातील मलाई गब्बरला भरवत होते, जे पाहून इन्स्टाग्राम युजरला भरून आले. इन या क्षणाचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि ‘असं प्रेम फक्त आई-बाबाच करू शकतात’ ; अशी कॅप्शन देऊन व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gabbar_is_supawstar या इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आई बापाची माया’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. ‘माझी आईला पण आवडत नव्हता. पण घरात मार्शल आला आणि आत्ता तिला मार्शल आवडतो आम्ही नाही’, ‘त्यांच्याबरोबरचे नातं काही वेगळेच’, ‘उन्हाळा प्रचंड वाढला आहे त्यामुळे आपल्या लाडक्या डॉगीला शक्यतो सकाळी लवकरच खायला द्या ‘ ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

Story img Loader