Viral Video : गाव व शहर यातला फरक सांगायला गेलो, तर बऱ्याच गोष्टी आहेत. पण, बदलत्या काळानुसार अनेक गावंसुद्धा विकसित होऊ लागली आहेत. बिग बाजार, डी-मार्ट, मॉल, मॅकडोनाल्ड आदी अनेक गोष्टी गावाकडेही दिसू लागल्या असतील. तरीही अजूनही लग्नात, एखाद्या कार्यक्रमात पंगतीत जेवण वाढण्याची पद्धत आजदेखील कायम आहे. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गावाकडच्या पंगतीच्या जेवणाची एक झलक दाखविण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video ) गावाकडचा आहे. गावातील घरात एखादा कार्यक्रम सुरू असतो. यादरम्यान कार्यक्रमाला उपस्थित माणसं जमिनीवर, मांडी घालून रांगेत बसलेली असतात. कारण- ती पंगतीत जेवायला बसली आहेत. कुटुंबातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण या पाहुण्यांना जेवायला वाढताना दिसत आहेत. कोणी वरण-भात, तर कोणी पाणी, तर कोणी गोडाचे पदार्थ पंगतीत बसलेल्यांना वाढताना दिसत आहेत. गावाकडच्या पंगतीच्या जेवणाचं सुख कसं असतं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : लायसन्स कुठे आहे? आजोबा-नातीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, दंड मागताच पाहा चिमुकलीने काय केलं

व्हिडीओ नक्की बघा…

गावच्या पंगतीच्या जेवणाचं सुखं

व्हायरल व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळाल्याप्रमाणे गावी बहुतांशी एखादा कार्यक्रम घराबाहेरच थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम पार पडला की, त्यानंतर जेवणाची लगबग असते. पत्रावळ्या, पाण्याचे ग्लास, मग जेवण वाढण्यास सुरुवात होते. याच सर्व जेवणाच्या पंगतीची झलक आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाली. घराबाहेर अंगणात सगळे जण पंगतीत जेवायला बसले आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहेत. यादरम्यान एका व्यक्तीनं या क्षणाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kokanpremi_anil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नशीबवान असतात ते लोक ज्यांना गावच्या पंगतीच्या जेवणाचं सुख मिळतं’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पंगतीत एखादा पदार्थ हवा असेल, तर कशी हाक मारतात हे सांगत ‘भाई, डाल दे वायशी, अजून एक लाडू बावासाठी’ अशी एक कमेंट केली आहे. तर दुसरा युजर म्हणतोय की, हे सुख फक्त आमच्या कोकणामध्ये’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.