Video Shows Woman Treated The Begging Toddler As Her Own Child : पैसा, प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते. त्यासाठी प्रत्येक जण जमेल तशी मेहनत करत असतो. पण, काहींना पैशाचा प्रचंड मोह असतो. त्यामुळे काहीवेळा पैशांचा हा मोह माणसाला इतक्या खालच्या थराला नेतो की तो पैसा मिळवण्याच्या नादात चांगले-वाईट विचार सोडून देतो. पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये एका महिलेची कृती पाहून तुमचेही डोळे भरून येतील आणि माणुसकी जिवंत राहायला हवी असेही तुम्ही नक्कीच म्हणाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत सिग्नल लागलेला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्यात उभ्या आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एका स्कूटीवर बसलेल्या जोडप्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक चिमुकला अन्न, पाणी व पैशाच्या शोधात सिग्नलवर भीक मागतो आहे. यादरम्यान तो स्कूटीवर बसलेल्या जोडप्याकडे जातो. त्यादरम्यान त्याच्या डोळ्यात कचरा जातो आणि तो डोळे चोळण्यास सुरुवात करतो. तेव्हा महिला नेमके काय करते ते एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reel/DGcGbirSoIe/?igsh=ZXczZTUyZmg3Z2Vj

तुम्ही अनेकदा प्रवास करताना पहिले असेल की, सिग्नलवर अनेक लहान मुले पोटा-पाण्यासाठी भीक मागत असतात. यादरम्यान अनेक जण पैसे द्यायचे नसतील तर त्याच्याबरोबर गैरवर्तणूक करतात. पण व्हायरल व्हिडीओत काहीतरी अनोखे पाहायला मिळाले आहे. सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलाला महिलेने मायेने जवळ बोलवून घेतले, त्याच्या हातात पैसे दिले आणि त्याचा डोळा चुरचुरत होता म्हणून त्याच्या डोळ्यात फुक सुद्धा मारली. तर असा व्हिडीओचा गोड शेवट झाला.

माझ्या वाटणीचे सुख त्या आईला मिळूदेत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lyrical_simmy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि ‘माझ्या वाटणीचे सुख त्या आईला मिळूदेत, एखाद्या आई आपल्या मुलाला मायेने जवळ घेते अगदी तसेच या महिलेने केले हे पाहून मन भरून आले, ज्याच कोणी नसतं त्याचा देव असतो आणि देव तुमच्यासारख्या लोकांमधून त्या गरजू मुलांपर्यंत पोहचतो’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.