Viral Video Shows Thief Finds No Cash Inside Home: रेल्वेस्थानक वा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या, तसेच बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट काढण्यात चोर माहीर असतात. पण, काही चोर मध्यरात्री घरात शिरून दागिने, पैसे चोरण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असो किंवा घरी आपल्या सामानाची चोरी होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे लागते. पाकीटमारांचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील, पण आज असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात चक्क चोरी करण्यासाठी माणूस घरात तर आला पण रिकाम्या हातीच घराबाहेर पडला. नक्की काय घडलं या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
व्हायरल व्हिडीओ तेलंगणाचा आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम येथे ही घटना घडली. चोरी करण्यासाठी घराचा दरवाजा खोलून चोर एका घरात शिरतो. पण, या घरात अगदी हॉलपासून स्वयंपाक घरापर्यंत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो. घरात तो चोरी करण्यासाठी गेला, तेथे त्याला दागिने सोडा, पैसेसुद्धा मिळाले नाहीत. त्यामुळे चोराने निराशा व्यक्त केली. पण, चोर सहजा सहजी निघून नाही गेला, तर त्याने घराबाहेर पडण्यापूर्वी एक मजेशीर गोष्टसुद्धा केली. नक्की चोराने काय केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
२० रुपयांची नोट ठेवली टेबलावर:
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तोंडावर रुमाल बांधून चोर चोरी करण्यासाठी घरात शिरला. हॉल, स्वयंपाकघरात गेल्यावर त्याला काहीच सापडलं नाही. त्यानंतर त्याचे लक्ष घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराकडे जाते. घरात पैसे नसल्यामुळे त्याने सीसीटीव्ही कॅमेराकडे पाहून संवाद साधला, निराशा व्यक्त केली. तसेच जाता जाता त्याने एक मजेशीर गोष्ट केली. त्याने फ्रीजमधून फक्त एक बाटली घेतली आणि २० रुपयांची नोट टेबलावर ठेवून तो घराबाहेर पडला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @umasudhir या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ८८.३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून युजर्ससुद्धा पोट धरून हसताना व मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “भावाने विचार केला असेल की या घरात सीसीटीव्ही आहे, पण पैसे नाहीत.” तर दुसरा युजर म्हणाला की, “खूप दयाळू मनाचा चोर आहे हा” आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसले आहेत.