Viral Video : घरात एखादा नवीन पाहुणा जरी राहायला येत असेल, तर त्याला राहण्यासाठी घरात जागा ही करावीच लागते. मग तो कुठे राहणार, कुठे झोपणार या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात. जर पाहुणा राहायला आल्यावर घरात एवढ्या गोष्टीचं नियोजन करावं लागत असेल, तर एखादं बाळ जन्माला आल्यावर कुटुंबातील सदस्यांची केवढी तारांबळ उडत असेल? तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून खरं तर तुम्ही थक्क होऊन जाल. कारण- एका रूममध्ये एक आई तिच्या नवीन येणाऱ्या बाळासाठी जागा करताना दिसते आहे. पण, हे बाळ पहिलं, दुसरं नसून चक्क सातवं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक गरोदर महिला तिच्या सहा मुलांसह आणि पतीसह वन रूम किचनमध्ये राहते. पण, लवकरच ती पुन्हा आई होणार आहे आणि तिच्या सातव्या मुलाला जन्म देणार आहे. तर वन रूम किचनमध्ये नवीन बाळासाठी जागा करण्यासाठी आईचे प्रयत्न सुरू आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला तिच्या लहान मुलांसह अरुंद घरात फर्निचरची अदलाबदली करताना दिसते आहे. पण, व्हिडीओ शेअर केल्यानंतर मुलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेवर करण्यात आला आहे. नवीन बाळासाठी जागा करणाऱ्या आईचा व्हिडीओ (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…असे मित्र कुठे भेटतात यार? मैत्रिणीला वाढदिवसाला दिलं असं सरप्राईज की… VIRAL VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

जेवणाच्या खोलीपेक्षा ‘बेडरूम’ असणे आवश्यक

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, लवकरच सातव्या मुलाला जन्म देणार असलेली महिला TikTok ची कन्टेन्ट क्रिएटर आहे. तीन वर्षांपासून महिला तेथे राहते आहे. त्याचप्रमाणे मुलं हळूहळू मोठी होऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांना प्रायव्हसी मिळावी आणि नवीन बाळासाठी जागा व्हावी म्हणून घरातील फर्निचरची अदलाबदली करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खूप पसारा असणाऱ्या खोलीत आई झटपट वस्तू नीटनेटकेपणानं ठेवते आहे. या वन रूम किचनमध्ये दोन मोठ्या गाद्या आहेत अन् एका बाळासाठी एक लहान खाट आहे. कुटुंबात एक मांजरसुद्धा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @MrsJellySantos या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा तुमच्याकडे सहा मुलं आणि १ बेडरूम असतो, तेव्हा जेवणाच्या खोलीपेक्षा ‘बेडरूम’ असणे आवश्यक असते, अशी कॅप्शन महिलेने व्हिडीओला दिली आहे. आई हा व्हिडीओ शेअर करत सांगतेय, “आम्ही आमच्या मुलांना त्यांच्याकडे काय आहे याची त्यांना काळजी घ्यायला शिकवतो आहे. आम्ही प्रार्थना करत राहतो आणि आम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहतो.”