Viral Video Of Crow & Dog : कार्टून म्हटलं की, आपल्याला साहजिकच आठवतात ती टीव्हीवरची धम्माल अन् मजा करणारी विविध पात्रं. टॉम अॅण्ड जेरी या कार्टूनचं उदाहरण घ्या ना… जेरी हा टॉमची मस्करी करतो आणि मग त्यांच्यात एक मजेशीर भांडण सुरू होतं. लहानपणी टीव्हीवर यांचं भांडण बघताना आणि खळखळून हसताना पूर्ण दिवस निघून जायचा. तर, आज असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये श्वान व कावळ्याची अशीच काहीशी मस्ती बघायला मिळाली आहे. पण, हे पाहून तुम्हाला टॉम अॅण्ड जेरी कार्टूनची नक्की आठवण येईल.
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) रस्त्याकडेला सिमेंटच्या एका कठड्यावर श्वान बसलेला दिसतो आहे. तितक्यात तिथे एक कावळा मागून येतो आणि श्वानाच्या शेपटीला चोच मारण्याचा प्रयत्न करतो; पण तितक्यात श्वानाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि मग घाबरून कावळा उडून जातो. त्यानंतर श्वान इथे-तिथे बघतो आणि पुन्हा आपल्या जागेवर बसतो. पण, कावळा काय हार मानायला तयार नसतो. तो पुन्हा श्वानाचा डोळा चुकुवून, त्याच्या मागे जाऊन बसतो आणि श्वानाच्या शेपटीला पुन्हा एकदा चोच मारण्याचा प्रयत्न करतो. नक्की पुढे काय घडतं? श्वान जिंकला की कावळा? व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
टॉम अॅण्ड जेरी परत आले…
व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, कावळा पुन्हा एकदा श्वानाच्या शेपटीला चोच मारण्यासाठी येतो. पण, यावेळी अनेक प्रयत्न करूनही तो श्वानाजवळ पोहोचू शकत नाही. तुम्हालाही व्हिडीओ पाहून वाटेल की, आता कावळा पुन्हा श्वानाची खोड काढेल पण, कावळा शेपटीजवळ पोहोचण्याआधीच श्वानाचं लक्ष जातं आणि त्याचा डाव फसतो. श्वान आणि कावळ्याच्या या मजेदार भासणाऱ्या प्रसंगाच्या वेळी रस्त्याकडेला कारमध्ये उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून घेतला आहे आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो अगदी एखाद्या कार्टूनच्या भागासारखा आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @fundogs.ig या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘विश्वासच बसत नाही आहे की हे दृश्य खरं आहे; कार्टूनमधील नाही’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओबद्दल एका नेटकऱ्याने, “हा कोणताही मजेशीर व्हिडीओ नाही. कारण- पक्षी घरटं बांधण्यासाठी कुत्र्याचे मऊ केस (फर) तोडत आहेत,” असे सांगितलं. तर, अनेक युजर्स या व्हिडीओवर पोट धरून हसताना आणि कावळा व श्वान दोघंही क्युट आहेत, असं म्हणताना दिसत आहेत.