Viral Video : वाहतुकीच्या नियमांचे मुद्दाम उल्लंघन करून अनेक जण विरुद्ध दिशेने दुचाकी चालवतात, हेल्मेट घालत नाहीत, वाहन चालवताना फोनवर बोलतात. मग वाहतूक पोलिस अशा बेफिकीर वाहन चालकांकडून दंड वसूल करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, आज कोणत्या तरुण-तरुणीला नाही तर वाहतूक पोलिसांनी एका चिमुकलीला सायकल चालवताना रोखलं आहे. नक्की काय आहे या व्हिडीओत खास चला बातमीतून जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओत एक चिमुकली तिच्या आजोबांबरोबर फेरफटका मारताना दिसते आहे. चिमुकलीच्या तिच्या छोट्याश्या सायकलवर बसली आहे आणि आजोबा तिच्या सायकलचे हँडल पकडून तिला रस्त्यावर राउंड मारण्यासाठी घेऊन आले आहेत. तितक्यात रस्त्याकडेला नातं व आजोबांना वाहतूक पोलिस पाहतात आणि चिमुकलीची सायकल थांबवतात. नक्की वाहतूक पोलिस चिमुकलीबरोबर काय संवाद साधतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

Action will be taken against drunken drivers by nakabandi in Pune city
शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
What security protocols kick in when a flight gets a bomb threat
Security Protocols in Flight : विमान कंपन्यांना धमकी मिळाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना आखल्या जातात? प्रवाशांची सुरक्षा कशी घेतली जाते?
Nine official ration shops suspended due to complaints of looting food grains from people shares
‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर कारवाई
Government blood banks in Mumbai violated e blood bank rules
सरकारी रक्तपेढ्यांकडूनच नियम धाब्यावर, रक्तसाठ्याची नोंद करण्यास टाळाटाळ; दंड भरण्याकडेही दुर्लक्ष
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
How to prevent your car insurance from lapsing
Car Insurance : कार इन्शुरन्सअचे तुम्हाला मिळणार नाहीत पैसे; ‘या’ चुका करत असाल तर आजच टाळा

हेही वाचा…चिमुकल्यांचं नवीन दुकान! उद्घाटन केलं, मित्र आले अन्… गावाकडील हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

लायसन्स कुठे आहे?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वाहतूक पोलीस चिमुकलीला दोन ते तीन वेळा विचारतात की, लायसन्स कुठे आहे? लहान मुलांकडे लायसन्स नसेल तर त्यांना दंड म्हणून आमच्या गालावर चुंबन (kiss) द्यावी लागते. तर चिमुकलीला काहीच कल्पना नसते की समोरची व्यक्ती काय बोलते आहे आणि यादरम्यान आश्चर्याचे, गोंधळाचे हावभाव तिच्या चेहऱ्यावर असतात आणि ॲटिटय़ूडने ती ट्रॅफिक पोलिसांकडे बघताना दिसत आहे. याचबरोबर वाहतूक पोलिस चिमुकलीच्या आजोबांना प्रेमाने समजावून सांगतात की, Main Road वरून तिला घेऊन जाऊ नका.कारण – अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सर सायकलवर नंबर प्लेट सुद्धा नाही आहे, दंड तर घेतलाच पाहिजे’ ; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. नेटकरी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. काही जण पोट धरून हसत आहेत तर अनेक जण सायकलवर नंबर प्लेट आणि डोक्यावर हेल्मेट सुद्धा नाही आहे असे सांगत आहेत. तर बरेच जण वाहतूक पोलिसांच्या स्वभावाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.