Viral Video Shows friendship between two friends : दोन व्यक्तींमध्ये मैत्री व्हायला काय लागतं? आवडीनिवडी, विचार जुळले की मैत्री होतेच. दररोज तासनतास बोलण्याचा, भेटण्याचा जेव्हा कंटाळा येत नाही तेव्हा या मैत्रीला एक वेगळंच वळण येतं. मग आनंदात पाठ थोपटणं, तर दुःखात पाठीशी उभं राहण्यापर्यंतचं हे नातं प्रत्येकाच्या आयुष्यात खूपचं खास असतं. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मित्र हॉस्पिटलमध्ये असताना त्याचा दुसरा मित्र त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हॉस्पिटलचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दोन मित्र दिसत आहेत. या दोन मित्रांपैकी एक मित्र आजारी असतो, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले असते. हॉस्पिटलमध्ये बेडवर एक तरुण झोपलेला असतो, तर त्याचा मित्र बेडपाशी टेबलावर बसलेला असतो. आपल्या मित्राला टेन्शनमध्ये, गुपचूप बेडवर झोपलेलं पाहून मित्राला एक युक्ती सुचते आणि तो मित्राच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी एक मजेशीर गोष्ट करतो. काय आहे ही मजेशीर कल्पना, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘शब्दांच्या पलीकडले…’ वाळूत हळूहळू चालणाऱ्या चिमुकल्याला श्वानाने केली मदत; पाहा ‘हा’ सुंदर क्षण

व्हिडीओ नक्की बघा…

मनासाठी मात्र मैत्रीशिवाय पर्याय नाही…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, तरुण इलेक्ट्रिक बेडवर टेन्शनमध्ये झोपलेला असतो; तर बेडशेजारी बसलेला मित्र इलेक्ट्रिक बेडचा रिमोट हातात घेतो आणि बटण दाबतो. बटण दाबताच बेड अलगद वर येऊ लागतो, हे पाहून बेडवर पडून असलेल्या मित्राच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते. त्यानंतर तो बटण दाबून पुन्हा बेड खाली करतो, असा त्याचा खेळ सुरू असतो. ‘शरीरासाठी हॉस्पिटल आहेच, पण मनासाठी मात्र मैत्रीशिवाय पर्याय नाही’ असा मजकूर या व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मन राखायला मैत्री ही हवीच!’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. काही जण तरुणाला काळजी घे असं म्हणत आहेत, तर अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट त्यांच्या मित्रांना टॅग करत आहेत, तर काही जण हार्ट इमोजीसह त्यांच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. कोणताही कठीण प्रसंग असो, मित्राच्या सहवासात आपल्या चेहऱ्यावर नेहमीच हसू उमटते, हे नाकारून चालणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows true friendship between two friends how a friend who is in tension due to illness smiles in a moment asp