Tsunami Cloud: सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालेलं आहे. दिवसा ऊन आणि रात्री काही जोरदार सरींचा पाऊस असं सध्या वातावरण सध्या आपण अनुभवत आहोत. नेहमी मोबाईल स्क्रीनवर स्कोल करत वेगवेगळे व्हिडीओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांना आता त्सुनामी सारख्या दृश्यानं सर्वांनाच हैराण केलंय. त्सुनामी सारख्याच भयंकर ढगांचं दृश्य अनुभवण्याची संधी नेटकऱ्यांनी लुटली. काही उत्साही लोकांनी सोशल मीडियावरही निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा नजारा सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरूवात केली आहे. या ढगांना पाहून काही वेळात त्सुनामीच येते की काय अशी मनात धडकी भरू लागते. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
निसर्ग अनेक विस्मयकारक चमत्काराने भरलेला आहे आणि व्हिडीओमध्ये कॅप्चर केलेल्या ढगांचे चित्तथरारक दृश्य तुफान व्हायरल झाले आहे. Reddit वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ढगांची एक विशाल रचना दिसत आहे. रिकाम्या रस्त्यावर घरांच्या मागे ढगांचे वर्तुळ दिसू लागल्यावर हे दृश्य दिसून येते. पहिल्याच नजरेत जणू काही त्सुनामी जवळ येत असल्यासारखा भास होऊ लागतो. याला आर्कस किंवा रोल क्लाउड म्हणून ओळखलं जातं, जे लाटांसारखं दिसतं.
व्हायरल झालेल्या व्हिडीओसोबत एक कॅप्शन देखील लिहीली आहे. “मी याला त्सुनामी असल्याचं समजत होतो, मी असे ढग यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.’ हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला हे अद्याप समजू शकलेले नाही. ही पोस्ट शेअर केल्यापासून व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर देखील प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. Reddit वर शेअर केलेल्या या व्हिडीओला १ लाखाहून अधिक लोकांनी अपवोट आणि २,५०० हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक इंटरनेट युजर्सना हा व्हिडीओ भयावह वाटला. तर ट्विटरवर या व्हिडीओला ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
आणखी वाचा : रस्त्यावर कॉटन कँडी विकणारा माणूस भावूक झाला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही रडू येईल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हैदराबादच्या रस्त्यावर ५००-५०० रूपयांच्या नोटांचा पाऊस, VIRAL VIDEO वर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा महापूर
एका यूजरने लिहिले की, ‘मला खरोखरच अशी भयानक स्वप्ने पडली आहेत.’ दुसरा म्हणाला, ‘ते इंटरस्टेलरमध्ये ग्रहांच्या भरतीच्या लाटेसारखे दिसत होते. थिएटरमध्ये असं काही पाहिल्यावर मी खूप घाबरतो. हे असेच दिसते. एकदम छान!’ तिसरा युजर्स गंमतीने म्हणाला, ‘मी माझी कार पॅक करून पळून जाईल.’ तर चौथा युजर म्हणाला, “मी एकदा ड्रायव्हिंग करताना असे ढग पाहिले होते. एक मोठी लाट आपल्याला धडकणार आहे असे वाटले, पण नंतर मला समजले की मी मरणार नाही.”