Viral Video Of LLB Students : शिक्षणाला वयाचे बंधन नाही, असे म्हणतात. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वय नाही तर जिद्द, इच्छाशक्तीची गरज असते. अनेकदा आर्थिक परिस्थिती किंवा घरातील अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अनेक जण लग्नानंतर किंवा वयाच्या ५० वर्षांनंतरसुद्धा शिक्षण घेतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये एलएल.बी. या अभ्यासक्रमासाठी वयाच्या पन्नाशीत दोन पुरुषांनी प्रवेश घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत (Video) एलएल.बी. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग दाखवला आहे. या सगळ्यांमध्ये ५० पेक्षा जास्त वयाचेही काही विद्यार्थी आहेत. त्यापैकी लारीदासन आणि रमण या दोन विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे वाढदिवसानिमित्त वर्गातील सगळे विद्यार्थी त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवतात. विद्यार्थी केक घेऊन येतात, केकवर या दोन्ही खास विद्यार्थ्यांचे नाव लिहितात आणि त्यांच्या बाकाजवळ जाऊन उभे राहतात. त्या दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याच्या केसांवर हात फिरवतात. तर हे दोन्ही विद्यार्थी सरप्राईज पाहून कशी प्रतिक्रिया देतात ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…आणखी काय हवं? नवऱ्याने खेळ जिंकण्यासाठी बायकोची केली अशी मदत की… VIRAL VIDEO जिंकतोय सगळ्यांचे मन

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वर्गातील सगळे विद्यार्थी जोरदार टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतात. ५० पेक्षा जास्त वयाचे हे विद्यार्थी केक पाहून आनंदित होतात. तसेच काही क्षणासाठी त्यांना कसे व्यक्त व्हावे हेच सुचत नसते. त्यानंतर पूर्ण वर्गासमोर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. नंतर अगदी प्रेमाने हे दोन्ही खास विद्यार्थी वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना केक भरवतात. यादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

आम्हाला वरिष्ठ मित्रांचा आशीर्वाद आहे

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @radhika__mangal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. LL.B. चा सर्वांत चांगला भाग म्हणजे आम्हाला वरिष्ठ मित्रांचा आशीर्वाद आहे, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून ‘शिक्षणाला वयाचे बंधन नसते’, असे म्हणत आहेत. तर, काही जण व्हिडीओतील या खास विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भावूक होत आहेत. हा व्हिडीओ तुमचेही मन जिंकेल एवढं नक्की…

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows two 55 plus man doing llb the students in their class celebrate their birthday asp