Video Shows Little Sister Dance On Baya Mazya Banguray Mangtaan R : लोकगीतांतील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कोळीगीते’. त्यात मुंबई आणि कोळीगीते हे समीकरण अगदी अनोखेच आहे. वाढदिवस, वरात, लग्न असो किंवा अगदी गणपती मिरवणूक ‘एखादं कोळी गीत लावायला सांग ना’ असे आवर्जून प्रत्येक जण म्हणतो. कारण या गाण्यांवर नाचण्याची मजा काही वेगळीच असते. ‘एकवीरा आई गो एकवीरा आई’, ‘हिंगालय देवी’, ‘वेसावची पारू’ ‘रसिकाच्या लग्नात’ या गाण्यांनी तर अक्षरशः लोकांच्या मनात घरच केलं आहे. तर असंच मनात घर करणारं एक नवीन कोळी गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आगरी कोळी संस्कृतीचं गोडवा सांगणारे ‘गं बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं…’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर आज याच गाण्यावर दोन बहिणींनी जबरदस्त डान्स केला आहे. यामध्ये दोन्ही बहिणींनी अगदी सेम पॅटर्नचा, पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं…’ या गाण्याला सुरुवात होते आणि दोन्ही बहिणी अगदी हुबेहूब स्टेप्स करण्यास सुरुवात करतात, जे पाहून तुम्ही तर थक्कच होऊन जाल. एकदा पाहाच हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर एखादे गाणे व्हायरल झाले की, त्यावर डान्स करून बघण्याचा प्रत्येकाचा मोह होतो. मग आई-बाबांनी हा ट्रेंड आपल्या गोंडस मुलींबरोबर फॉलो करण्याचे ठरवले. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एक लहान बहीण तर दुसरी मोठी बहीण डान्स करत आहेत. दोघींचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स, त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा आहे. एवढा लहान वयात एवढा परफेक्ट डान्स येतो हे पाहून तर नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत आणि हा व्हिडीओ इतरांना मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vjsakpal29 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्याचे ठरवले आहे. नेटकरी डान्स पाहून चिमुकलींचे कौतुक करताना दिसत आहेत आणि ‘काय डान्स केलाय पोरींनी’, ‘छोटी खुप छान नाचते’, ‘दहा वेळा बघून सुद्धा बघावसं वाटतं एवढा सुंदर डान्स केलाय’, ‘यांना शिकवणाऱ्याला सलाम’, ‘असच शिक्षणात पण प्रगती असुदे डान्स छान करतात मुली’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत…