Viral Video : भारतीय आणि देशी जुगाड यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. एखादी गोष्ट सोपी करण्यासाठी, कधी एखाद्या गोष्टीला मजेशीर वळण देण्यासाठी, तर कधी कमी खर्चात जास्त फायदा होण्यासाठी देशी जुगाड केले जातात. त्यातील बहुतेक जुगाड हे यशस्वीसुद्धा होतात, तर काही फसतात, तर काही अगदीच थक्क करून सोडतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ ( Viral Video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन चिमुकल्यांना एकच सायकल चालवायची असते. त्यासाठी ते एक जबरदस्त जुगाड करतात.
सायकलवरून दोन व्यक्ती प्रवास करतात. तेव्हा आपण पाहिले आहे की, एक व्यक्ती सायकल चालवते, तर दुसरी मागे बसलेली असते. अशाच प्रकारे सहसा सायकल चालवली जाते. पण, आज व्हायरल व्हिडीओतील चिमुकल्यांनी अजब जुगाड शोधून काढला आहे. दोन्ही चिमुकले एकच सायकल, एकाच वेळी चालविताना दिसले आहेत. नेमकी कशा प्रकारे ही सायकल चालवण्यात आली आहे ते एकदा व्हायरल व्हिडीओतून ( Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…‘पुणे तिथे काय उणे…’ थंडीत रिक्षा चालवण्यासाठी रिक्षाचालकाचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
व्हिडीओ नक्की बघा…
काय टॅलेंट आहे राव…
व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. दोन चिमुकले अनोख्या पद्धतीने सायकल चालवत आहेत. एका पेडलवर एक चिमुकला, तर दुसऱ्या पेडलवर दुसरा चिमुकला उभा आहे आणि सायकल चालवली जाते आहे. कुठेही सायकल चालवताना तोल गेला नाही किंवा ते दोघे पडलेसुद्धा नाहीत अशा खास पद्धतीत सायकल चालवण्यात आली आहे, जे पाहून तुम्ही या दोघांच्या टॅलेंटचे कौतुक कराल. दोघांचीही सायकल चालविण्याची हौस फिटली आणि एक खास जुगाडदेखील पाहायला मिळाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hasna_aur__hasana याला इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत चिमुकल्यांचा हा जुगाड पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत आणि विविध शब्दांत त्यांचे कौतुक करीत आहेत. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’, ‘काय टॅलेंट आहे राव, पुढे आयुष्यात नक्की काहीतरी कराल’, ‘मी पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं आहे’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून आले आहे.