आजच्या काळात लोकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. चायनीज असो वा इटालियन, टोमॅटो सॉसचा वापर जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात केला जातो. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत लोक टोमॅटोची कमतरता सॉसच्या मदतीने भरून काढत आहेत. पण तुम्ही कधी हा सॉस बनवताना पाहिला आहे का. हे सॉस कारखान्यात मोठ्या प्रमाणात बनवले जातात आणि नंतर पॅक करून बाजारात विकले जातात. पण जर तुम्ही हे कसे बनवले जाते हे पाहिले तर कधीच सॉस खाणार नाही.
एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये कारखान्यातील काही दृश्य दिसत आहे. यामध्ये टोमॅटो सॉस बनवण्याची काही प्रक्रिया दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही किळस येईल. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टोमॅटो कारखान्याबाहेर पडले आहेत. टोमॅटो ट्रकमध्ये ठेवले असून ते सडलेले दिसत आहेत. आता या कुजलेल्या टोमॅटोपासून सॉस बनवायचा आहे की फेकून देण्यासाठी काढले आहेत हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाहीय. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.
अनेक ब्रँडचे टोमॅटो सॉस बाजारात उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ कोणत्या कारखान्याचा आहे, याचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. अपूर्ण माहितीसह व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आजपासून टोमॅटो सॉस खाणे बंद करा. म्हणजे हे सर्व टोमॅटो सॉस बनवण्यासाठी ठेवले होते. बाहेर ठेवलेले हे टोमॅटो सडलेले होते.
पाहा व्हिडीओ
या व्हिडिओसोबत फारशी माहिती शेअर केलेली नाही. मात्र त्यानंतरही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोकांनी असे लिहिले की खराब टोमॅटो फेकून देण्यासाठी बाहेर काढले असावे, असे अनेकांनी लिहिले. ही अपूर्ण माहिती लोक सांगत आहेत. मात्र, अशा टोमॅटोपासून सॉस बनवला जात असेल तर तर ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
यापुढे टोमॅटो सॉस खाताना दहावेळा विचार कराल
घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सॉस खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.