करोना आता पुन्हा डोकं वर काढू लागल्याने जगाच्या चिंतेत भर पडली आहे. चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस भीतीदायक होत असताना, सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडुन करण्यात येत आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. खरंतर मास्क वापरणे अनेकांना त्रासदायक वाटते. त्यामुळे अनेकजण मास्क वापरणे टाळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मास्क घातल्यानंतर आपल्याला पाणी प्यायचे असेल, काही खायचे असेल तर तो आधी काढावा लागतो, मग तो स्वच्छ ठिकाणी ठेवा, इतर ठिकाणची धुळ त्याला लागणार नाही याची काळजी घ्या अशा गोष्टींचा अनेकांना त्रास वाटतो. याच त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एका माणसाने मास्कचा एक भन्नाट जुगाड केला आहे. त्याने चक्क असा मास्क बनवला आहे जो जेवताना काढण्याची गरज नाही. तोंड उघडल्यावर तो मास्कही उघडतो आणि सहज जेवता येते. चोचीप्रमाणे दिसणारा हा मास्क कसा आहे पाहा.

आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: तरुणाला आपल्या गाडीजवळ उभे असलेलं पाहताच मालकाने केले असे काही की…; Viral Video एकदा पाहाच

हा भन्नाट जुगाड नेटकऱ्यांनाही आवडला असून, अनेकांनी का कल्पनेचे कौतुक केले आहे. ‘नवा व्हेरीयंट नवा मास्क’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.