Video Shows School Unique Train Themed Classroom : भरभक्कम शैक्षणिक शुल्क देऊन अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. त्यांच्यावर अभ्यासापेक्षा जास्त अनेक प्रकल्पांचा तणाव आहे असे जाणवते. पण, आजही सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण दर्जेदार असल्याचे अनेक व्हिडीओद्वारे वारंवार सिद्ध झाले आहे. इथे मुलांना खिचडी, खेळायला नवनवीन खेळ तर वार्षिकोत्सव कार्यक्रमांद्वारे शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांबरोबर डान्स सादर करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ (Video) तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील, रुद्रराम गावातील जिल्हा परिषद हायस्कूलचा आहे. शिक्षकांनी मिळून वर्गाच्या भिंतींचे रूपांतर ट्रेनच्या डब्यांसारखे केले आहे, ज्यामुळे फक्त शिक्षक आणि शिक्षिकांना नाही तर विद्यार्थ्यांनाही वर्गात जाण्याऐवजी ट्रेनमध्ये चढण्याचा अनुभव येणार आहे. भिंती, खिडक्या अगदी हुबेहूब ट्रेनसारख्या डिझाइन केल्या आहेत. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढवण्यासाठी ट्रेन-थीम असलेली एक अनोखी संकल्पना साकारली आहे. हा अनोखा उपक्रम तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून नक्की बघा …

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, शाळेतील काही वर्ग बाहेरून अगदी ट्रेनच्या डब्यासारखे दिसत आहेत, तर खिडक्यासुद्धा अगदी हुबेहूब बनवून घेतल्या आहेत. पण, तुम्ही वर्गात डोकावून पहिले तर तुम्हाला शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी विविध उपक्रमांचा समावेश केल्याने या उपक्रमाने अधिक आनंददायक वातावरण तयार झाले आहे. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालक दोघांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

वर्गांना ट्रेनमध्ये रूपांतरित करण्याची कल्पना सुचली…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) ANI च्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही विद्यार्थी आणि पालकांना ट्रेन थीमबद्दल त्यांचे मतदेखील विचारले आहे. शिक्षक श्रवण कुमार यांच्या म्हणण्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून वर्गांना ट्रेनमध्ये रूपांतरित करण्याची कल्पना सुचली. तसेच या कल्पनेने आश्चर्यकारक काम केले, ज्यामुळे विविध गावांतील मुले शाळेत येत आहेत आणि त्यांच्या मुलांचा प्रवेश या शाळेत घेताना दिसत आहेत.