सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये मुलांसाठी हॅलोविनच्या दिवशी कॅंडी वाटण्यासाठी चक्क हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) चा वापर केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंंतर यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकन सैन्याचा आहे. ओक्लाहोमा येथे अमेरिकन सैन्याच्या सैनिकांनी हॅलोविनचा दिवस साजरा केला होता. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमेरिकन सैन्याचा HIMARS रॉकेट उभा असलेला दिसत आहे. या रॉकेटमधून शूट होताच त्यातून वेगवेगळे कॅंडी बाहेर पडलेले दिसत आहेत. या रॉकेटमधून कॅंडी शूट होताच लहान मुलांनी ते जमा करण्यासाठी पळापळ सुरू केली. रस्त्यावर पडलेले कॅंडी जमा करण्यासाठी या लहान मुलांनी एकच गर्दी केली होती.
हा व्हिडीओ आर्मी फोर्ट सिलने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘हॅलोवीनच्या दिवशी मुलांना कँडी देण्यासाठी तुम्ही कशी अपेक्षा कराल? फायर मिशन!!!” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. HIMARS मधील हा शूट1-78 फील्ड आर्टिलरी बटालियनने केला होता. HIMARS हे हलके वजनाचे मल्टिपल रॉकेट लाँचर आहे जे १९९० च्या उत्तरार्धात यूएस आर्मीने विकसित केले होते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, HIMARS हे पाच टन वजनाच्या ट्रकवर बसवलेले क्षेपणास्त्र प्रक्षेपक आहे जे एकापाठोपाठ सहा क्षेपणास्त्रे सोडू शकते.
आणखी वाचा : पक्ष्याने चक्क महिलेचे इअरबड चोरले, पाहा हा मजेदार VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळकरी मुलीने ‘सामी-सामी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, रश्मिकाही झाली फिदा
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आर्मी सेनेसाठी वारण्यासाठी दिलेले हे रॉकेट कॅंडी शूट करण्यासाठी वापरलं…हे अत्यंत चूकीचं असल्याचं काहीनी सांगितलं. तर काहीनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.