Video Shows Father Gives Best Surprise To Family : प्रेम म्हणजे काय हे एखाद्याला शब्दात सांगता आले तरीही प्रेमाबद्दलच बोलणे, ती भावना बाळगणे, त्याला जपणे हे फारच महत्त्वाचे असते. पूर्वी चार भिंतींच्या आड लपलेल्या प्रेमाची आज उघडपणे चर्चा केली जाते. अगदी १३ ते १४ वर्षांची मुलेसुद्धा आम्ही प्रेमात पडलोय, म्हणून जगाशी भांडताना दिसत आहोत. तर हेच खरे प्रेम असते का तर नाही… फक्त जोडीदाराचे नव्हे, कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणात रजा काढून घरी राहणे, स्वयंपाकाचे कौतुक करणे, स्वतःच्या पसंतीने खरेदी करून एखादी वस्तू देणे म्हणजेसुद्धा प्रेम असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओनुसार (Video) खास पद्धतीत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केल्याचे दिसते आहे. लेक आई आणि बाबांचा व्हिडीओ शूट करीत असते. बाबा ऑफिसवरून घरी येतात तेव्हा आई गुलाबाच्या पाकळ्या टाकून बाबांचे स्वागत करते. तसेच बाबांच्याही हातात भरपूर पिशव्या असतात. तेसुद्धा छोट्या पिशवीतून आईसाठी एकेक करून तीन गुलाब काढतात आणि आईच्या हातात देतात. त्यानंतर झेंडूची फुले आईवर टाकतात आणि तिच्या केसात गजरा माळतात. एकदा बघाच हे खास सेलिब्रेशन…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आपल्या बायकोला गुलाब आणि गजरा दिल्यावर बाबा लेकीला मिठी मारून, तिच्याही गळ्यात गजरा माळतात. त्यानंतर दुसऱ्या पिशवीतून बायकोसाठी भाजीसुद्धा खरेदी खरेदी करून आणल्याचे दिसते आहे, जे पाहून आई भरपूर खूश होते. त्यानंतर बाबा लेकीच्या बाबा लेकीच्या केसात गजरा माळल्यानंतर लेकाच्या हातात केळीचा घड देतात आणि अशा प्रकारे फक्त बायकोसाठी नव्हे, तर कुटुंबातील सदस्यांसाठीही सरप्राईज घेऊन येतात आणि हा दिवस आणखीन खास करतात.

भाजी आणणे mandatory आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @anaghasawantt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा, यांच्यासारखे प्रेम मिळावे, अशी माझी इच्छा आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आह. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. तसेच भाजी आणणे mandatory आहे, किती गोड, मला या पिढीचे प्रेम आवडते’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत आणि हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे .