Crowd Harassed In Maha Kumbh Train: महाकुंभमेळासाठी प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अशातच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका रेल्वे गाडीतील संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये काही प्रवासी एका गरीब विक्रेत्याला त्रास देत आहेत. मोड आलेल्या कडधान्यांची विक्री व्हावी या आशेने रेल्वेत चढलेल्या या विक्रेत्याबरोबर जे घडले त्याची कल्पनाही कोणी नाही केली नसेल. गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरीब कष्टाळू विक्रेत्याला प्रवाशांनी लुटले आहे हे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे. कष्ट करून चार पैसे कमावाणाऱ्या प्रमाणिक विक्रेत्याबरोबर कोणी अशा पद्धतीने कसे काय वागू शकतो असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांना पडला आहे. कहर म्हणजे काही प्रवासी हा प्रकार पाहून मदत करण्याऐवजी हसत बसले आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वे गाडीच्या डब्यात एक क्रेता चढतो जो आलेल्या कडधान्यांची भेळ विकत आहे. पण तो प्रवाशांच्या गर्दीमध्येच अडकतो. कशी तरी वाट काढून तो तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो पण काही प्रवासी त्या विक्रेत्यालाच लुटतात. ककोणतेही पैसे न देता त्याच्या डोक्यावर असलेल्या कडधान्याच्या टोपलीत हात घालून कडधान्य चोरतात. एक नव्हे तर अनेक प्रवासी विक्रेत्याला अशाच पद्धतीने लुटतात. कोणीतीही त्याला पैसे देत नाही किंवा मदतही करत नाही, उलट त्याची मज्जा घेत हसत बसतात. दरम्यान, विक्रेता प्रवाशांना रागाने उत्तर देताना दिसत आहे. हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गुंडगिरी

ही ट्रेन प्रयागराजला जात होती की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही दरम्यान व्हायरल , व्हिडिओमध्ये एका प्रवाशाला “महाकुंभ” म्हणताना ऐकू येते. या व्हिडिओने ७ लाखांहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आहे, त्यापैकी काहींनी प्रवाशांवर जोरदार टीका केली आहे.

खाली दिलेल्या लिंकवर केलेल्या लिंकवर क्लिक करा

सोशल मीडियावर संतापले लोक

“एका प्रामाणिक कष्टाळू विक्रेत्याला लुटणाऱ्या लोकांचे लज्जास्पद कृत्य,” एका माजी वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने लिहिले, “हे लोक चोरी करून हसत आहेत, त्यांना वाटते का की गंगेत डुबकी मारल्याने त्यांची पापे धुऊन जातील?” दुसऱ्या एका x वापरकर्त्याने विचारले, “जर आपण एकमेकांचा आदर करणार नाही तर आपण एक देश म्हणून कसे पुढे जाऊ शकतो?” दुसऱ्याने विचारले, “तर मग हे लोक त्यांचे पाप धुण्यासाठी महाकुंभमेळ्याला जात आहेत?” एकाने लिहिले, “या लोकांनी एका गरीब माणसाची चोरी केली आहे. यामुळे त्यांना किती नुकसान सहन करावे लागेल याची त्यांना कदाचित कल्पना नसेल. गरिबाची प्रार्थना रंकाला राजा बनवते, गरिबाचा शाप लंका जाळतो.”

Story img Loader