Viral Video : प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शहरांत व गावात वसतिगृह (हॉस्टेल) बांधण्यात आले आहेत. कारण शहरातील मुंबईतील घरांचं घर भाडे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणार नसते, तर तर प्रत्येक गावात शाळा, कॉलेज उपलब्ध नसते. अशातच शिक्षण,काम आणि आपल्या उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही वसतिगृहे त्यांना मदत करतात. तरुण-तरुणींना डोक्यावर छप्पर आणि पोट भरण्यासाठी जेवण सुद्धा पुरवले जाते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये चिमुकला हॉस्टेलमध्ये जाण्याची तयारी करतो आहे.

आपलं घर, गाव सोडून हॉस्टेलमध्ये राहायला जाणं म्हणजे अगदी राहणीमानापासून ते खाण्या-पिण्याचा गोष्टींपर्यंत सर्वच बदलून जाते. त्यामुळे आपल्यातील प्रत्येकासाठी ही गोष्ट कठीण असते. तर आज व्हायरल व्हिडीओत (Viral Video) असंच काहीस पाहायला मिळालं आहे. हॉस्टेलला जाण्यासाठी मुलगा तयारी करत आहे. एक पेटी घेऊन तो काही गरजेच्या वस्तू त्यात भरताना दिसतो. पण, या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी हा क्षण कसा असतो, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असते हे व्हायरल व्हिडीओतून नक्की बघा…

हेही वाचा…‘आयुष्यात असा एक तरी…’ मित्राला रडताना पाहून टी-शर्टने पुसले डोळे अन्…; VIRAL VIDEO जिंकेल तुमचं मन

व्हिडीओ नक्की बघा…

‘जेव्हा मुलं हॉस्टेलमध्ये राहायला जातात’

व्हायरल व्हिडीओत (Viral Video ) तुम्ही पाहिलं असेल की, पेटीत सामान भरून जेव्हा मुलगा हॉस्टेलला जायला निघतो. तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या घरापासून, कुटुंबातील सदस्यांपासून दूर जायचं आहे या भावनेने चिमुकला सुद्धा भावूक होतो. पण, नंतर मनाची तयारी करून हॉटेलकडे जायला निघतो. कुटुंबातील सदस्यांपैकी एक व्यक्ती मुलाला हॉस्टेलमध्ये बाईकवरून सोडायला जाते. त्यानंतर काही दिवसांनी हॉस्टेलमध्ये तो कसा राहतो, जेवतो तर कुटुंबातील सदस्य त्याला भेटायला येतात असे काही क्षण या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘हे दिवसच आयुष्य जगायला शिकवतात’ अशी कॅप्शन तर ‘जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलं हॉस्टेलमध्ये राहायला जातात’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. अशातच एका युजरने, ‘हॉस्टेलच्या प्रवासापासून ते नोकरीच्या प्रवासा पर्यंत. घरी गेल्यावर पाहुण्या सारखे राहवे लागते दोन चार दिवस’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.