Video Shows Handmade Bamboo Rollercoaster Ride : अम्युझमेंट पार्क्समधील रोलरकोस्टर राईडमध्ये बसण्याची अनेकांची इच्छा असते. पण, काही जण या राईडमध्ये बसायला घाबरतात. कारण अशा राईडमध्ये अडकली तर काय कराव, आपण त्यात उलटे लटकलो तर काय, अशीही भीती अनेकांच्या मनात असते. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राईडमध्ये बसण्याचा आनंद लुटला असेल. पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये अम्युझमेंट पार्कमध्ये राईड असते तशी रोलर कोस्टर राईड एका खास वस्तूपासून बनवण्यात आली आहे, जे पाहून तुम्ही इम्प्रेस व्हाल.

तर व्हायरल व्हिडीओत रोलर कोस्टर राईड चक्क बांबूपासून बनवण्यात आली आहे. या बांबू पासून बनवलेल्या ट्रॅकवर लहान मुले मज्जा करताना दिसत आहेत. बांबूच्या या ट्रॅकवर स्लेज (sledge) (स्लेज – राईडवर बसण्यासाठीचे साधन) ठेवून त्यावर ही लहान मुले बसली आहेत. एक व्यक्ती बांबूपासून बनवलेले ट्रॅक आपल्या हातांनी बदलतो आणि मग मुले वेगवेगळ्या ट्रॅकवर सरकत पुढे जातात. लहान मुले एखाद्या पार्कमध्ये खेळतायंत तसेच अगदी या नैसर्गिक बांबूपासून बनवण्यात आलेल्या या राईडचा आनंद घेताना दिसत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी खास बांबू पासून ट्रॅक बनवले आहेत. अम्युझमेंट पार्क्समधील रोलरकोस्टर राईडमध्ये अडकण्याची, पडण्याची भीती असते. पण, या नैसर्गिक राईडमध्ये असा कोणताही धोका तुम्हाला जाणवणार नाही. तसेच या राईडवर बसलेल्या कोणालाही ईजा होणार नाही आणि तो अगदी आरामात ये-जा करू शकेल, हे लक्षात घेऊन ही खास नैसर्गिक राईड बनवण्यात आली आहे; ज्याचे तुम्हीही कौतुक कराल.

ही राईड अवश्य ट्राय करा (Viral Video) :

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @travelling.shillong या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “बांबू रोलर कोस्टर? ही गावाने बनवलेली राईड खूप मजेदार दिसतेय, पण ती फक्त मुलांसाठी आहे का?’, ‘कोण म्हणतं रोलर कोस्टर फॅन्सी असायला हवेत?’, ‘ही गावाने बनवलेली राईड अवश्य ट्राय करा’, ‘व्हिडीओ पाहून मला डोरेमॉन कार्टूनची आठवण आली’, ‘पर्यावरणपूरक राईड’, ‘स्मार्टफोनशिवाय आयुष्य’, आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.