Viral Video Shows Vlogger Takes Mother To Salon For First Time : सकाळी सगळ्यात लवकर उठून सगळ्यात शेवटी झोपणारी एकमेव सदस्य म्हणजे आई. आई प्रत्येकाच्या सुख-दुःखाचा विचार करते, पण स्वतः कुठेतरी आयुष्य जगायचे विसरून जाते. आईला वर्षातून एक साडी जरी दिली तरी वर्षातून बऱ्याच वेळा तीच साडी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आवर्जून घालते. पण, कधीच आपल्याकडून कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा ठेवत नाही. तर आज सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एका मुलीने आईला पहिल्यांदा पार्लरमध्ये घेऊन जाण्याचे ठरवले आहे.

आपण प्रत्येक महिन्याला आयब्रो, वर्षातून एकदा हेअर कट, वॅक्स, क्लीनअप करतो. पण, आधीच्या काही महिलांना या सगळ्याची आवड नसते किंवा त्या तिथे जाणे त्यांना गरजेचे वाटत नाही. पण, इन्स्टाग्राम ब्लॉगर आयुषी करसौलिया ही तरुणी तिच्या आईला पहिल्यांदाच पार्लरमध्ये घेऊन गेली होती. एक महिना आधीपासून ती यासाठी आईची परवानगी घेत होती आणि एक महिन्यानंतर ती पार्लरमध्ये येण्यासाठी तयार झाली. कशाप्रकारे आईला पार्लरमध्ये घेऊन गेली नक्की बघा…

Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”

हेही वाचा…स्वप्नातले घर! टायरचे बेसिन, स्कुटरचा सोफा अन् बरेच काही… बाईकप्रेमीने घराची केली अशी सजावट की… Viral Video पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

घरातील जबाबदाऱ्यांच्या पलीकडे

व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पहिले असेल की, आयुषी सगळ्यात पहिले तिच्या आईची प्रेक्षकांशी ओळख करून देते, “ही फक्त माझी आई श्रीमती रेखा शर्माची कथा नाही, तर तिच्या पिढीतील असंख्य आईंची कथा आहे, जी तिच्या जीवनात समाधानी आहे आणि घर, मुले सांभाळत आहे’ असं म्हणते. आयुषी तिच्या आईला पहिल्यांदा हेअर स्पा आणि फेशियल करण्यासाठी घेऊन आली आहे. पार्लरच्या आतमध्ये जाताना आयुषी तिच्या आईला म्हणते की, ‘सारे बाल कटवा दूंगी (तुझे सगळे केस कापून टाकूया ) आणि हे ऐकून आईला धक्काच बसतो आणि एक हास्यास्पद संवाद तिथे दोघींमध्ये रंगतो.

घरच्या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जग कसे असते हा अनुभव आईला घेण्यास मदत करणे हे आयुषीचे ध्येय होते. सर्व जण आपल्या पालकांना जीवनाची दुसरी बाजू पाहण्यास किंवा बघण्यास मदत करू, जेणेकरून ते कधीही स्वतःसाठी काही न केल्याबद्दल पश्चात्तापाने मागे वळून पाहणार नाहीत. असा खास संदेश तिने व्हिडीओतून दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा (Viral Video) हा व्हिडीओ @ayushi__karsauliya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनासुद्धा हा व्हिडीओ भरपूर आवडला आहे. एक युजर म्हणाला, ‘दररोज मी माझ्या पालकांना सांगतो की, जीवनाचा आनंद घेण्यासाठी, आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा, कारण त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मेकओव्हर नंतर काकींच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून खूप बरे वाटले’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader