Video Shows Puppy And Its Owner Play Sliding Game : आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या दैनंदिन कामांमध्ये जी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास. तो विश्वास, जो आपण इतरांवर ठेवतो आणि जो इतर आपल्यावर ठेवतात. या विश्वासाच्या बळावरच हे जग चालते, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. असे असले तरीही एखाद्याचा विश्वास तोडायचा की जिंकायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते. मग तो माणूस असो किंवा प्राणी. आज सोशल मीडियावर याच गोष्टीची प्रचीती दाखविणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत चिमुकला आणि त्याच्या पाळीव श्वानाचे छोटेसे पिल्लू खेळ खेळताना दिसत आहेत. चिमुकल्याच्या घराच्या बाहेर पायऱ्यांना लागून संरक्षक कठडा आहे. या कठड्याच्या अगदी सुरुवातीला चिमुकला श्वानाच्या छोट्याशा पिल्लाला ठेवतो. त्यानंतर चिमुकला खाली जाऊन उभा राहतो आणि श्वानाचे छोटेसे पिल्लू त्याच्या पायाने सरकत एखाद्या घसरगुंडीवरून जसे खाली येते अगदी त्याचप्रमाणे खाली येताना दिसते. तसेच यादरम्यान चिमुकला काय करत असतो ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, चिमुकला श्वानाच्या पिल्लाला कठड्याच्या अगदी सुरुवातीला ठेवतो आणि धावत खाली जाऊन त्याचे संरक्षण करण्यासाठी उभा राहतो. त्यानंतर ते श्वानाचे पिल्लू आपल्या इवल्याशा पायांनी स्वतःच कठड्यावरून घसरून खाली येते. चिमुकला खाली बसून श्वानाच्या पिल्लाला अलगद आपल्या झोळीत घेतो. दोघांचा हा निरागस खेळ बराच वेळ चालू असतो. तसेच व्हिडीओतून दोघांनी एकमेकांवर ठेवलेला विश्वास अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.

हा व्हिडीओ पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू आले…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hrithik.edit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून दोघांनी एकमेकांवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे कौतुक करीत आहेत. श्वानाचे पिल्लू स्वतःच पायांनी सरकते आहे हे पाहून खूप मस्त वाटते आहे, दिल तो बच्चा हैं जी, माझा मूड ऑफ होता; पण हा व्हिडीओ पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू आले, ज्या प्रकारे त्याने स्वतःच्या मालकावर विश्वास ठेवला ते पाहून खूप छान वाटले आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader