Viral Video: दुसऱ्याला मदत करणे ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. ही मदत अनेक स्वरूपात असू शकते. विविध सामाजिक उपक्रमांत आपण सहभागी होतो किंवा आर्थिक मदत देत असतो. पण, एखाद्याचे दुःख किंवा त्याची परिस्थिती समजून घेऊन किंवा बघून केलेली वैयक्तिक मदत करणे याचे सुख सगळ्यात वेगळे असते. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सायकल किंवा हातगाडीवरून सामान वाहून नेणाऱ्या चालकाला एक तरुणी मदत करताना दिसत आहे.

कडाक्याच्या उन्हामध्ये सायकल किंवा हातगाडीवरून अवजड सामान वाहून नेणाऱ्या चालक वा भारवाहकांचे खूप हाल असतात. एक सायकल-रिक्षाचालक उड्डाणपुलावरून अवजड सामान घेऊन जात आहे. ते पाहताच एक तरुणी त्या चालकाला मदत करण्यासाठी, त्यांचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या गाडीला ढकलताना दिसत आहेत. थोड्या वेळाने तीसुद्धा थकते आणि मित्राला मदतीसाठी बोलावते. व्हिडीओ शूट करणारा मित्र आणि तरुणी मिळून, सायकल-रिक्षाचालकाची अवजड सामानाची गाडी ढकलू लागतात. नंतर तरुणी काय करते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

changing health economics and management are overburdening our government health system
आरोग्यव्यवस्थेचे बदलते अर्थकारण रुग्णाला मेटाकुटीला आणणारे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Thane police, Thane traffic, Thane police injured,
ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Don't bargain with farmers farmer saying truth video goes viral
VIDEO: “कष्टाची किंमत करा भाजीपाल्याची नको” बाजारात शेतकऱ्याला आलेला अनुभव ऐका अन् तुम्हीच सांगा तुम्हाला ‘हे’ पटतंय का?
Police Commissioner Amitesh Kumar has warned of action if high powered loudspeakers are used in ganesh immersion processions Pune new
विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास जप्त; ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादार, ‘डीजें’ विरुद्ध कारवाईचा इशारा
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?

हेही वाचा…‘मीसुद्धा एक माणूसच…’ बंद पंखा, तुटलेली खुर्ची; लोको पायलटचा हा VIDEO सांगतोय ‘त्याच्या’ केबिनची स्थिती…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सायकल-रिक्षाचालक मोठा कूलर आणि काही अवजड वाहने घेऊन उड्डाणपुलावरून जातो आहे. कडक उन्हात अवजड वाहने घेऊन जाताना पाहून, त्याचा भार हलका करण्यासाठी तरुणी मदतीचा हात पुढे करते. नंतर थोड्या वेळाने सायकल-रिक्षाचालकास थांबण्यास सांगून त्याला डबा, पाण्याची बाटली आणि त्याच्या अंगावर शालसुद्धा ओढते. हा मदतीचा हात नाही, तर सायकल-शिक्षाचालकाला विश्रांती घेण्यासाठीसुद्धा दिलेली एक संधी आहे.

तुमच्यातील अनेक जण एखादा वृद्ध रस्ता ओलांडताना दिसला की, त्यांना रस्ता सुखरूप ओलांडून देण्यास मदत करण्यासाठी पुढे जात असतील. तर, या व्हिडीओतसुद्धा असंच पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाख व्ह्युज आले आहेत. तरुणीच्या दयाळूपणाच्या या हृदयस्पर्शी कृत्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे; जो सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.