Viral Video Shows woman gifting a red rose to auto driver : गजबजलेल्या शहरी जीवनात लोक सहसा अनोळखी लोकांशी संवाद करणे टाळतात. पण, समोरच्या माणसावर विश्वास बसला की मग विविध गोष्टींवर गप्पा सुरु होतात. तुम्ही आजवर ओला किंवा उबर कॅब, ऑटो चालकांचे ग्राहकांबरोबर भांडण झालं, त्यांना त्रास दिला आदी अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण, आज एका तरुणीला उबेर ऑटो रिक्षातून प्रवास करताना एक वेगळाच अनुभव आला आहे. ऑटो चालकाबरोबर झालेल्या संवादातून तिला त्याच्या फुलांबद्दलच्या आकर्षण वा प्रेमाविषयी माहिती मिळाली. मग हे ऐकून तिने पुढे काय केलं लेखातून सविस्तर जाणून घेऊ या.
व्हिडीओमध्ये तरुणी ऑटो रिक्षा चालकाशी संवाद साधताना दिसत आहे. या संवादादरम्यान त्यांनी शेती व निसर्गाबद्दल चर्चा तर केलीच. पण, त्याला फुलांविषयी असणार प्रेम सुद्धा त्याने व्यक्त केलं ; असे तरुणीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर हे पाहता तरुणीच्या डोक्यात एक युक्ती येते. व्हिडीओ जसा पुढे जाऊ लागतो. तसा ती स्वतःच्या बॅगेतून लाल रंगाचा कागद काढते आणि त्याचे एक सुंदर गुलाबाचे फुल बनवते. तरुणीने कशाप्रकारे गुलाबाचे फुल बनवले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
पाणावलेले डोळे तुमचेही मन जिंकतील:
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणीकडे A4 साईझचे काही रंगीत कागद होते. रिक्षा चालकास फुलांची आवड असल्यामुळे ती या कागदांचा ओरिगामी स्टाईलमध्ये गुलाबाचे फुल तयार करते आणि प्रवास संपल्यावर रिक्षा चालकाच्या हातात देते. या क्षणी रिक्षा चालकाचे स्मितहास्य, व त्याच्या पाणावलेले डोळे तुमचेही मन जिंकतील. रिक्षा चालक येथेच थांबला नाही. तर त्याने चेहऱ्यावर हसू आणून, फुल हातात घेऊन चालकाने आपल्या रिक्षात असणाऱ्या गणेश मूर्तीवर ठेवले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अवी कृष्णा नटेसन या कन्टेंट क्रिएटरच्या @_avinat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये तिने या खास प्रवासाबद्दल सांगत रिक्षा चालक व तिच्या संवादाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून, गुलाबाचे फुल देताच रिक्षा चालकाचे पाणावलेले डोळे पाहून भावुक झाले आहेत आणि विविध कमेंट करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ‘त्याचे डोळे!!! त्या एका छोट्या गुलाबाने तो किती आनंदी झाला आहे हे दाखवते…’