Viral Video Shows Woman Mimics Cartoon Shinchan : छोटा भीम, बाल हनुमान, डोरेमॉन, टॉम ॲण्ड जेरी आणि सगळ्यांचा आवडता शिनचॅन आदी अनेक कार्टून्स पाहत आपल्यातील अनेक जण मोठे झाले आहेत. शिनचॅन या मस्तीखोर पात्राला तर विसरून चालणारच नाही. या कार्टूनचे टायटल सॉंग (Title Song)सुद्धा आपल्यातील अनेकांना तोंडपाठ आहे. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर तरुणीने शिनचॅनची हुबेहूब नक्कल करून दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ (Vira Video) हरियाणाचा आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणीला पकडले. तरुणीने ट्रॅफिकचे अनेक नियम मोडले होते. त्यामध्ये हेल्मेट नसणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणे, रेड सिग्नल तोडणे आदींचा समावेश होता. वाहतूक पोलिस आता दंड वसूल करणार हे माहीत असूनसुद्धा या प्रसंगाला तिने मनोरंजक वळण दिले. परिस्थिती गांभीर्याने घेण्याऐवजी महिलेने तिच्या आतल्या कार्टून फॅनची नक्कल करण्यास सुरुवात केली. नक्की काय म्हणाली ती तरुणी ते व्हायरल व्हिडीओतून नक्की बघा…

हेही वाचा…‘माझ्या कॅब ड्रायव्हरचा ड्रायव्हर…’ चालकाला झोप आवरेना, मग प्रवाशाने केली ‘अशी’ मदत; पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्ही माझ्या आईला विचारू शकता

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, वाहतूक पोलिस तरुणीला नाव विचारताच “मैं हूँ शिनचॅन. आप मेरी माँ से पूछ सकते हैं“ (मी शिनचॅन नोहारा आहे. तुम्ही माझ्या आईला विचारू शकता) असे म्हणते. अगदी हुबेहूब आवाज, शिनचॅनप्रमाणे वाक्यांना सूर देत तरुणी नक्कल करताना दिसली, जे पाहून उपस्थितांना धक्का बसला आणि तेथील वातावरण थोडे हलकेदेखील झाले. एका अज्ञात पुरुषाने तिच्या वतीने दंड भरण्याची तयारी दर्शवून, अधिकाऱ्याला तिला सोडून देण्याची विनंती केली.

पण, वाहतूक पोलिस अधिकारी अमर कटारिया यांनी संयम राखून, व्यावसायिकता कायम ठेवली आणि तिला सल्ला हेल्मेट वापरण्याचा सल्लादेखील दिला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ वाहतूक पोलिस अधिकारी अमर कटारिया यांच्या @amarkatariaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिकिया व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “पोलिसांपासून वाचण्यासाठी निन्जा टेक्निक.” तर, अनेक जण तरुणीला पाहून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.