Viral Video Shows Woman Received Diwali Gift From His Husband : दिवाळीनिमित्त यंदा सर्वत्र गजबज पाहायला मिळते आहे. चाळ, ऑफिस, इमारती आदी ठिकाणी आकाशकंदील, पणत्या, दारात रांगोळी, तोरण यांच्याद्वारे सजावट करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दिवाळी किंवा दिवाळी पाडव्यानिमित्त नवरा-बायको एकमेकांना भेटवस्तूसुद्धा देतात. सहसा सणानिमित्त गिफ्ट देताना आपण सोनं, पैसे किंवा एखादी साडी गिफ्ट म्हणून देतो. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये बायकोला आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून, तिला दिवाळीचं खास गिफ्ट देण्यात आल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ प्रीतम कुमार सेनने शेअर केला आहे. प्रीतमच्या बाबांनी त्याच्या आईला दिवाळीचं खास गिफ्ट दिलं आहे. या व्हिडीओची सुरुवात वडिलांनी आईसाठी गिफ्टमध्ये दिलेली प्रत्येक वस्तू एका टेबलावर मांडलेली आहे. लेक एकेक करून प्रत्येक वस्तू व्हिडीओत दाखवतो. गिफ्टमधे स्किनकेअर प्रॉडक्ट, नेलपॉलिश, केसांच्या क्लिप, लिपस्टिक, मुलतानी माती, टिकलीपर्यंतच्या अनेक वस्तूंचा समावेश असतो. नवऱ्याने आणलेलं गिफ्ट पाहून पत्नी काय प्रतिक्रिया करते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘दादा पनवेलला सोडाल का?’ श्वान बनला रिक्षा चालक, तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन

व्हिडीओ नक्की बघा…

पुढच्या वेळी मेकअप बॉक्स आणा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, लेक आईसाठी बाबांनी गिफ्टमध्ये काय काय आणलं आहे ते व्हिडीओत सांगतो. त्यानंतर लेक “तुला गिफ्ट आवडलं का?” असं आईला विचारतो. तेव्हा आई चेहऱ्यावर स्माईल ठेवून, “हो”, असं उत्तर देते. त्यानंतर “आता पुढच्या वेळी मेकअप बॉक्स आणा”, असंही आवर्जून सांगते. त्यावर बाबा, “हो नक्की”, असं उत्तर देतात. दिवाळी असो किंवा एखादा सण बायकोला नवरा नेहमी दागिने, साडी देतो; पण, खास गिफ्ट स्वरूपात दिलेल्या या अनेकविध वस्तू पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ampritam1993 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बाबांनी हे आईला गिफ्ट केले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचे भरभरून कौतुक करीत आहेत; तर काही जण इतक्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून दिलेलं हे खास गिफ्ट पाहून भावूक झाले आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ज्या पुरुषांनी हा व्हिडीओ पाहिला असेल, त्यांना समजेल की, महिलांना डायमंड, सोनं नाही तर असे छोटे छोटे गिफ्ट आणि तुमचा वेळ हवा असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows woman receiving a whole set of diwali gifts from her husband son documents the adorable moment asp