Viral Video Shows Age Is Just A Number : आयुष्य मनाप्रणाणे जगता आले पाहिजे असे आपल्यातील अनेकांना वाटते. आयुष्य जगताना अनेक अडचणी, अनेक आव्हाने कमी-अधिक प्रमाणाने समोर उभी राहतात आणि आयुष्य तिथेच थांबते, साचून राहाते. जाबदारीच्या ओझ्याखाली अनेक महिला जगणेच विसरून जातात आणि सासरकडील माणसांच्या भीतीने तर कधी लाज वाटेल म्हणून त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या सोडून देतात. तर , आज असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एक महिला गाण्यावर अगदी मनोसोक्त थिरकताना दिसते आहे, जे पाहून तुम्ही तिचे नक्कीच कौतुक कराल.
व्हायरल व्हिडीओनुसार (Video) मैदानात एक कार्यक्रम सुरु असतो. अजय देवगण, तमन्ना भाटियाचा हिम्मतवाला या चित्रपटातील ‘नैनो में सपना’ हे गाणे कार्यक्रमात वाजण्यास सुरुवात होते. अनेक महिला, तरुणी आणि चिमुकल्या या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. पण, यामध्ये एका महिलेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण ‘नैनो में सपना’ हे गाणे वाजताच ती ग्रुपमधून बाहेर पडते आणि गोल-गोल गिरक्या घेण्यास सुरुवात करते. महिलेचा डान्स पाहून तुम्हीही सगळ्या चिंता सोडून एकदा तरी असे नाचले पाहिजे असे नक्कीच म्हणाल.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पहिले असेल की, लेक तिच्या आईचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असते. ‘नैनो में सपना’ हे गाणे वाजताच महिला अगदी सगळे विसरून मनोसोक्त डान्स करण्यास सुरुवात करते. यादरम्यान तिच्या डान्स स्टेप्स, तिचे हावभाव आणि तिचा उत्साह अगदीच पाहण्यासारखे आहेत. गाण्यावर थिरकताना पाहून मैदानात उपस्थित अनेक तरुणी, महिला व चिमुकल्यांनी टाळ्या वाजवत, तर काहींनी आरडाओरडा करत महिलेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.
तरुणींमध्ये भीतीचे वातावरण
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mume_le_laddu_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी महिलेचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘तिची लेक तिला डान्स करताना प्रोत्साहन देते आहे हे पाहून खूप छान वाटते आहे, आयुष्याचा प्रत्येक क्षण असाच आनंदाने जगता आला पाहिजे, तरुणींमध्ये भीतीचे वातावरण दिसते आहे, महिलेचा डान्स बघून काही तरुण मुली ईर्षा तर महिलेच्या वयाच्या बायका मात्र आनंदाने प्रोत्साहन देत आहेत’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.