viral video shows Google office Stuff Vending Machine : ऑफिसला घाईगडबडीत निघताना कधी चार्जर घरी राहतो, तर कधी पाण्याची बॉटल तर कधी हेडफोन. तसेच हेडफोन घरी राहिला आहे हे ट्रेन, बस किंवा अगदी रिक्षात बसल्यावरच आठवते, त्यामुळे पुन्हा घरी जाऊन हेडफोन घेऊन येणे आपल्यातील कोणालाच शक्य नसते. मग प्रवासात येता-जाता वेळ कसा घालवायचा असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये हेडफोन नसल्याने तिने जबरदस्त जुगाड केला आहे.
व्हायरल व्हिडीओत @trishala_naman ही तरुणी तिचे हेडफोन्स घरी विसरलेली असते. पण, ती गूगल ऑफिसमध्ये काम करते असते, त्यामुळे ती ऑफिसमध्ये असणाऱ्या वेंडिंग मशीनजवळ जाते. त्यानंतर ऑनलाइन खरेदी करतात त्याचप्रमाणे अगदी हेडफोन हा शब्द सर्च करून त्याला कार्टमध्ये जोडते. मग स्क्रिनवर पैसे दाखवले जातात आणि मग एटीएममधून पैसे येतात, अगदी तशाप्रकारे हेडफोनचा एक बॉक्स वेंडिंग मशीनमधून बाहेर येतो. एकदा बघाच हा चकित करणारा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
त्या हेडफोन्ससाठी पैसे भरावे लागले का? (Viral Video)
गेल्यावर्षी पुण्यातील गूगलचे ऑफिस कसे आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ऑफिसमधील बसण्याची जागा, कॅफेटेरिया (जेथे विविध खाद्यपदार्थांचे सेक्शन होते), गेमिंग रूम (जिथे कॅरम बोर्ड, टेनिस, बुद्धिबळ आणि इतर खेळ खेळण्याच्या सुविध होत्या.) तसेच आराम करण्यासाठी असलेल्या विविध प्रकारच्या चेअर्ससुद्धा होत्या; तर आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गूगलच्या ऑफिसमध्ये अगदी हेडफोनसुद्धा उपलब्ध असतात. एटीएममधून पैसे काढले जातात अगदी त्याचप्रमाणे छोट्याश्या पांढऱ्या बॉक्समधून हेडफोन्स वेंडिंग मशीनमधून बाहेर येतात आणि तरुणी कामासाठी त्याचा उपयोग करताना दिसते आणि तिला यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trishala_naman या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तुम्ही हेडफोन्स घरी विसरता, पण तुम्ही गूगल ऑफिसमध्ये काम करता’; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी तरुणीला तुझ्या इथे जॉबसाठी कसा अप्लाय करायचा हे अगदी मजेशीर पद्धतीने विचारताना दिसत आहेत. तुला त्या हेडफोन्ससाठी पैसे भरावे लागले का?, तुला ते हेडफोन्स ऑफिसमधून निघताना परत द्यावे लागले का?, भारतीय फुकटच्या गोष्टी चांगल्या प्रकारे वापरतात, तुझ्या पगारातून पैसे वजा होतील’ आदी कमेंट नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.