Video Shows Young Boy Rescued Cat : माणूस सध्या पाळीवच नाही, तर भटक्या प्राण्यांवरसुद्धा जीव लावताना दिसत आहेत. अनेक लोक लहान प्राण्यांच्या जीव वाचवण्याला फार महत्त्व देत नाहीत. मात्र, अनेक लोक असेही असतात, जे या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असतात. एखादी व्यक्ती संकटात असेल तेव्हा काही जण घाबरून जातात; तर काही जण कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता त्यांच्या मदतीला धावून जातात. दोन दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणाने मांजरीचा जीव वाचवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत (Video) उंच इमारतीच्या एका फ्लॅटच्या खिडकीवर एक मांजर बसलेली दिसते आहे. इमारतीची उंची पाहून त्या मांजराच्या जीवाला धोका असल्याचे दिसते आहे. त्याचा जीव वाचण्याची अजिबात शाश्वती नाही, असेसुद्धा वाटते आहे. पण, यादरम्यान एका तरुणाला तिची दया येते आणि तो मांजरीच्या मदतीसाठी धावून येतो. मांजर ज्या खिडकीवर बसलेली दिसते आहे. त्याच्या बाजूच्या घरातच हा तरुण राहत असतो. तर तरुण मांजरीची स्वतःच्या घराच्या खिडकीद्वारे कशी मदत करतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…


व्हिडीओ नक्की बघा…

घाबरत घाबरत मांजर एकेक पाऊल टाकते…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, मांजरीला वाचवण्यासाठी तरुण स्वतःच्या फ्लॅटच्या खिडकीतून एक वस्तू दुसऱ्या फ्लॅटच्या खिडकीपर्यंत लावून ठेवतो. घाबरत घाबरत मांजर एकेक पाऊल टाकते. एकदा खाली वाकून बघते. नंतर पुन्हा चालण्याची हिंमत करतो आणि त्या पांढऱ्या वस्तूवरून चालत येत अखेर तरुणाच्या फ्लॅटच्या खिडकीतून घरात सुखरूप जाते. व्हिडीओच्या सुरुवातीपासून मांजर खाली पडणार तर नाही ना, ती सुखरूप घरात पोहोचेल ना याची भीती तुमच्याही मनात येईल एवढे तर नक्की…

पलीकडे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हे पाहिले आणि याचा एक व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर या @rajadhiraj_dwarkadhish_vn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘मांजराची सुटका करण्यात यश आले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा त्यांच्या भावना हार्ट इमोजीसह कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows young boy rescue a cat who stuck in building window asp