viral video shows young girl posing as manager : आपल्यातील अनेक जण लॉकडाऊनपासून वर्क फ्रॉम होम करतात. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक ते दोन दिवस ऑफिसला बोलावले जाते किंवा कायमचे घरून काम करण्याची परवानगी दिली जाते, त्यामुळे लॉकडाऊननंतर आता ऑफिसमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जेव्हा जेव्हा विनंती केली जाते, तेव्हा घरून काम करण्याचीसुद्धा मुभा असते. तसेच या विषयांवरचे अनेक रील्स, मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर आज सोशल मीडियावर एका चिमुकलीने एका मॅनेजरची नक्कल केली आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) घरी शूट करण्यात आला आहे. आर्या मॅनेजर बनली आणि समोर लॅपटॉप ठेवला आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला कर्मचाऱ्याचा कॉल येतो. कर्मचारी विचारतो, ‘मी घरून काम करू शकतो का’, त्यावर मॅनेजर ‘का’ असं विचारते. त्यावर कर्मचारी, ‘घरापासून ऑफिस लांब आहे, त्यामुळे प्रवास करणे कठीण जाते’ असे सांगतो. त्यावर मॅनेजर कर्मचाऱ्याला प्रवास करण्याचे पर्याय सुचवते. तर मॅनेजरने नेमके कोणते पर्याय सुचवले आणि कर्मचाऱ्याने त्यावर काय उत्तरे दिली, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘हा आहे भारत…’ हत्ती घेतोय माहुताकडून पाय चेपून; एक पाय पुढे केला अन्… पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

तुझ्याकडे स्केटिंग बोर्ड आहे का?

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, ‘तू कार किंवा बाईकने का येत नाहीस ऑफिसला?’ असं मॅनेजर आर्या विचारते. तेव्हा माझ्याकडे कार नाही, बाईक मला चालवता येत नाही असे कर्मचारी उत्तर देतो आणि पुन्हा एकदा वर्क फ्रॉम देण्याची विनंती करतो. पण, मॅनेजरदेखील हार मानत नाही आणि ‘तुझ्याकडे स्केटिंग बोर्ड आहे का?’ विचारते. ‘स्केटिंगची भीती वाटते’ असं कर्मचारी उत्तर देतो. कर्मचाऱ्याला वाटते की, आता मॅनेजर वर्क फ्रॉम होमची परवानगी देईल; पण इथेच एक मोठा आणि मजेशीर ट्विट् येतो.

मॅनेजर कर्मचाऱ्याला म्हणते की, ‘एक काम कर, तयार होऊन घरी बस. मी तुला घ्यायला येते.’ त्यावर कर्मचारी नाराज होऊन ओके मॅनेजर असं उत्तर देतो. अशाप्रकारे मॅनेजर आणि कर्मचाऱ्याची ही खास रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी @storiesbytwoplusone या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल झाली आहे. नेटकरीसुद्धा या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करत, त्यांच्या भावना कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.