Video Shows Young Group Celebrating Co-Passenger Student’s Birthday : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. पण, आपल्यातील काही जणांना वाढदिवस हा अगदी रोजच्या दिवसासारखा वाटतो. तर काही जण अगदी एक महिना आधीपासूनच तयारी करायला सुरुवात करतात. कारण बघायला गेल तर वाढदिवस साजरा करणारे कुटुंबातील सदस्य व उत्साही मित्र-मैत्रणी असतात. तर तुम्ही आतापर्यंत मित्र- मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य, अगदी तुमच्या प्रियकर-प्रेयसीने तुमचा वाढदिवस साजरा केला असेल. पण, एखाद्या ट्रेनमध्ये शेजारी बसणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तुमचा वाढदिवस कधी साजरा केला आहे का? नाही… तर हा व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओ काही मित्र-मैत्रिणी उज्जैन ट्रिपला गेलेले असतात. यादरम्यान ट्रेन प्रवास करताना त्यांच्या बरोबर प्रवास करणाऱ्या एका छोट्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो. तो आपल्या शिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणींबरोबर प्रवास करत असतो. त्याचा वाढदिवस आहे जेव्हा त्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपला कळते. तेव्हा सगळे मिळून त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवतात. त्या ग्रुपकडे स्लाईज फ्रुट केक असतो. मग ज्याचा वाढदिवस असतो तो विद्यार्थी स्लाईज फ्रुट केक कापतो आणि ट्रेनमध्ये बसलेले सगळे गाणे गाण्यास सुरुवात करतात. हे पाहून चिमुकला सगळ्यात शेवटी काय करतो हे व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सहप्रवाशाचा वाढदिवस साजरा होतो आहे (Viral Video) :
ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक जण इतर प्रवाशांना बसायला जागा सुद्धा देत नाही किंवा सीट एक्सचेंज पण करायला मागत नाही. पण, इथे व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिल असेल की, इथे तर सहप्रवाशाचा वाढदिवस साजरा होतो आहे. तसेच आपला वाढदिवस साजरा केला म्हणून सगळ्यात शेवटी हा विद्यार्थी पाया पडताना दिसतो आणि सगळे त्याचे संस्कार बघून त्याला थांबवताना दिसतात आणि शेवटी तो भावूक झालेला पण दिसतो आहे, जे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.
चिमुकल्याचा चेहऱ्यावरील आनंद, त्याचे हावभाव अगदी पाहण्यासारखे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vishal_tawde_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘प्रवासात स्लीपर कोचमध्ये सह-प्रवासी विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करताना ‘ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या ग्रुपचे भरभरून कौतुक करत आहेत आणि असा वाढदिवस साजरा करण्यात आलेला तुम्हीही कधी पहिला नसेल.