Viral Video: हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. त्यांपैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय; ज्यात एक भाऊ गाणं गात असून, त्याची बहीण त्यावर डान्स करताना दिसतेय.

लहान मुलं खरंच खूप गोड आणि निरागस असतात. त्यांचं बोलणं, वागणं याकडे नकळत आपलं लक्ष वेधलं जातं. हल्ली सोशल मीडियामुळे तर एखादं गाणं ऐकल्यावर ते लगेच त्यांना तोंडपाठ होते. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे नवनवीन व्हिडीओ सतत पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात भावंडं हटके पद्धतीने गाणं गाताना आणि डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा अनोखा डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये लहान मुलगा गिटार वाजवत गाणं गात असून, त्याची लहान बहीण त्या गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. यावेळी भाऊ गिटारवर ‘डान्स पे चान्स मार ले’ हे गात आहे. या व्हिडीओतील भावंडांची गाणं गाण्याची अनोखी पद्धत आणि डान्स करण्याची स्टाईल पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @restu_singgih_hanggara या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “मी तुला मारून टाकेन…”, गल्लीतल्या भांडणात चिमुकलीने दिली धमकी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘हिला शाळेत…’

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलेय, “हे काहीतरी वेगळंच आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मस्त व्हिडीओ.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मी दहा वेळा परत परत पाहिला हा व्हिडीओ.” चौथ्या युजरने लिहिलेय, “खूप मस्त मुलांनो.”

Story img Loader