Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, हे वाक्य तुम्ही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये ऐकलंच असेल. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीने करणं, याला खरं प्रेम म्हणतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत, त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचे प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. या व्हायरल व्हिडीओमध्येदेखील असंच प्रेम पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
shocking video
VIDEO : चूक कोणाची? रस्त्याच्या मधोमध चालत होत्या आजीबाई, भरधाव वेगाने धावणाऱ्या बसने.. व्हिडीओ होतोय व्हायरल
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
unknown girl gave flowers
‘भावाची विकेट पडली ना राव’ अनोळखी तरुणीनं दिलं फुल अन् तो लाजला; VIDEO पाहून तुम्हालाही विश्वास बसेल लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा भररस्त्यात आपल्या पत्नीचा फोटो काढताना दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, त्यामुळे आजींना रांगोळीसोबत फोटो काढायचा होता, त्यासाठी त्या खाली बसलेल्या दिसत आहेत. आजींचा फोटो काढण्यासाठी आजोबासुद्धा खाली बसतात आणि सुंदर फोटो काढतात. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवरील कॅप्शनमध्ये, “तो : प्रेम म्हणजे कय असतं गं?”, “ती : शेवटच्या श्वासापर्यंत आवड आणि निवड एकच असणं हे प्रेम असतं”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा: डॉक्टर नाही देवमाणूस म्हणा… मुंडावळ्या अन् नवरदेवाच्या पोशाखात लग्न अर्धवट सोडून गायीवर केले उपचार; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मन जिंकलस भावा”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @maz_man_tuzyat या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास साडे पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर आतापर्यंत तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “असं खरं प्रेम करणारी पिढी आता गेली, आता फक्त नात्यांचा टाईमपास सुरू आहे”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “प्रेम तेव्हाच निरंतर राहते, जेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू एक होतात.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “आयुष्यात असं प्रेम करणारी व्यक्ती हवी.”

Story img Loader