Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, हे वाक्य तुम्ही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये ऐकलंच असेल. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं, त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीने करणं, याला खरं प्रेम म्हणतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा