Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ आपण पाहतो. त्यात विविध वयोगटांतील व्यक्तींचा समावेश असतो. लहान लहान चिमुकली मुलेदेखील आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध कला सादर करणाऱ्या लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आजवर तुम्ही पाहिले असतील. आताही अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; परंतु यामध्ये एक चिमुकली चक्क पुशअप्स मारताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हल्लीची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत. त्यांना आपल्या सर्व कला, आवडी-निवडी व्यवस्थित ठाऊक असतात. सोशल मीडियामुळे त्यांच्या या सर्व गोष्टींना अधिकाधिक वाव मिळू लागला आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांना खूप यश मिळतं. आता व्हायरल होत असलेल्या एका सहा वर्षांच्या चिमुकलीनं असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
अनेकांना व्यायाम करायचा म्हटलं की, अंगावर कंटाळा येतो. पण, आता व्हायरल व्हिडीओतील सहा वर्षांच्या चिमुकलीनं फक्त एक मिनिटामध्ये १०० पुशअप्स मारले आहेत. यावेळी ती अजिबात थकली नाही. चिमुकलीला पुशअप्स मारताना पाहून आसपास उभे असलेले तरुण-तरुणीही अवाक् झाल्याचे दिसले. त्यानंतर तिने एका हातावरही पुशअप्स मारले. ते पाहून आसपास उभे असलेल्यांनी तिला दाद दिली.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, या व्हिडीओवर ‘सातारची ६ वर्षाची धाकड गर्ल स्वरा’, असं लिहिण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdhani__satara007 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.
तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “सातारची वाघीण.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सातारची कन्या लय भारी.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “सातारकरांची खासियत आहे ही. बाकीच्यांना जमत नाही, ते सातारकर करून दाखवतात.”